शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
3
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
4
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
5
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
6
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
7
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
8
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
9
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
10
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
11
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
12
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
13
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
14
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
15
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
16
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
17
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
18
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
19
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
20
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाला हवी चक्क चांदीची वीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:34 IST

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतील तीन नगरसेवकांचा शहरात भलताच बोलबाला सुरू झाला आहे. एका नगरसेवकाने १ किलो चांदीच्या विटेची ...

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतील तीन नगरसेवकांचा शहरात भलताच बोलबाला सुरू झाला आहे. एका नगरसेवकाने १ किलो चांदीच्या विटेची मागणी करत गोळ्या घालण्याची धमकी दिली तर दुसऱ्या दोघांनी बिल्डरसोबत वाद घातल्याने सारा प्रकार पोलीस स्थानकात गेला आहे. तिघा नगरसेवकांच्या कारनाम्याची चर्चा शहरात सुरू आहे.

शहरातील गजबजलेल्या रामआळी परिसरात असलेल्या एका ज्वेलर्सला मोबाइलवरून फोन करून धमकावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धमकावणारी व्यक्ती ही नगरसेवक असल्याची माहिती पुढे आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका नगरसेवकाने त्या ज्वेलर्सला कॉल करून तब्बल १ किलो चांदीच्या विटेची मागणी केली. ही मागणी होताच दुकानदाराने १ किलो चांदीची किंमत सांगून त्याचे पैसे द्या, असे सांगितल्याने नगरसेवकाचा पारा चढला होता. ही घटना १४ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी २.१५ च्या सुमारास घडली.

सुवर्णकाराने पैसे मागितल्याने पित्त खवळलेल्या नगरसेवकाने १६ सप्टेंबर रोजी पुन्हा कॉल केला, मात्र हा कॉल रात्री १०.५० वाजण्याच्या सुमारास केला. या वेळी पुन्हा त्याच्याकडे १ किलो चांदीच्या विटेची मागणी केली, न दिल्यास गोळ्या घालून मारण्याची धमकी तसेच शिवीगाळ केली. याबाबत त्या सुवर्णकाराने थेट पोलीस स्थानक गाठले व घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्याबाबतचा लेखी तक्रार अर्जदेखील सुवर्णकाराने शहर पोलीस स्थानकात दिला आहे. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ५०४, ५०६ अन्वये एन.सी. दाखल केली आहे.

दुसरा प्रकार विठ्ठल मंदिर परिसरात नगरसेवक विरुद्ध बांधकाम व्यावसायिक यांच्यात घडला आहे. विठ्ठल मंदिरसमोर एका बिल्डरचे बांधकाम सुरू आहे, यावरून तेथील नगरसेवक बंधूंनी त्यावर आक्षेप घेतला. बांधकामाच्या ठिकाणी टाकलेल्या डीपीबाबत हा आक्षेप होता. हा वाद विकोपाला जाऊन संबंधित ठेकेदार व नगरसेवक यांनी परस्परांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दिले. या अर्जावरून पोलिसांनी नगरसेवक आणि संबंधित बिल्डर यांना १४९ नुसार नोटीस बजावल्या आहेत.