शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरवर फौजदारी कारवाई करावी

By admin | Updated: January 29, 2015 23:28 IST

सुधाकर कदम : बांधकाम जमीनदोस्त करण्याची मागणी.

चिपळूण : नवीन कोळकेवाडी खांदाट येथे निसर्ग नावाने बांधण्यात आलेली इमारत अनधिकृत आहे. हे बांधकाम जमीनदोस्त करुन बिल्डरवर एमआरटीपी कायद्याप्रमाणे फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी सुधाकर कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. चिपळूण तालुक्यातील नवीन कोळकेवाडी खांदाट येथील कदम यांनी आपल्या मिळकतीतील वडिलोपार्जित घर बांधण्यासाठी २० गुंठे जागा टेरव येथील शरद पर्वतराव कदम यांना ओळखीचे असल्याने दिली. याबाबत कदम यांनी रितसर खरेदीखत करुन नोंदविले. या जमिनीचा व्यवहार १२ लाखाला ठरला असताना कदम यांनी केवळ २ लाख रुपये दिले म्हणून विचारणा केली असता सर्वच रक्कम पेपरवर लिहिली तर टॅक्स बसेल, असे सांगून उर्वरित रक्कम इमारतीच्या बांधकामादरम्यान देईन, असे सांगितले. परंतु, आजअखेर रक्कम न देता माझी फसवणूक केली आहे, असे कदम यांनी यावेळी बोलताना सांगितले. बिल्डर कदम यांनी आपल्या मिळकतीत अर्धे इमारतीचे बांधकाम सुरु केले म्हणून आपण ग्रामपंचायतीकडे सन २०१२ आणि २०१३मध्ये तक्रार अर्ज दिला. परंतु, कार्यवाही झाली नाही. म्हणून २६ डिसेंबर २०१४ रोजी तहसीलदार, गटविकास अधिकारी, सरपंच यांना बांधकाम जमीनदोस्त करण्याबाबत मागणी करणारे निवेदन दिले. त्यावरही योग्य ती कारवाई झाली नाही. नियमबाह्य व बेकायदेशीर बांधकामाला पाठिशी घातले जात असल्याचा आरोप सुधाकर कदम यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित बिल्डरवर कडक कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.यावेळी जागरुक मंचचे तानू आंबेकर, विजय भागवत, अविनाश सकपाळ उपस्थित होते. (प्रतिनिधी)