शहरं
Join us  
Trending Stories
1
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
2
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
3
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
4
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
5
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
8
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
9
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
10
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
11
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
12
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
13
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
16
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
17
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
18
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
20
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
Daily Top 2Weekly Top 5

पाेलीस अधिकाऱ्यांसह अंमलदारांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:34 IST

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थ, सेक्स रॅकेट व गांजासह विविध घटना घडत आहेत. या ...

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थ, सेक्स रॅकेट व गांजासह विविध घटना घडत आहेत. या घटनेच्या संशयित आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनांचा तपास करून त्याचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पाेलीस अधिकारी आणि अंमलदारांचा पाेलीस अधीक्षक डाॅ. माेहितकुमार गर्ग यांनी गाैरव केला. तसेच या घटना अजून घडू नयेत आणि या घटनेपासून रत्नागिरी जिल्हा कसा दूर राहील यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.

गेल्या महिन्यात रत्नागिरी शहरात तीन ठिकाणी गांजा विक्री होणार असल्याची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून शहर पोलिसांना संशयित आरोपींना पकडण्यात यश आले होते. त्याचबरोबर जनआशीर्वाद यात्रेदरम्यान चेन चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील संशयित आरोपींना पकडण्यात रत्नागिरी शहर पोलिसांना यश आले आहे.

गुन्ह्याचा छडा लावण्यात पाेलिसांना यश आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी शुक्रवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात जाऊन अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह देऊन गाैरव केला. या काैतुकाने अधिकारी आणि अंमलदारही भारावून गेले. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, विजय जाधव, पोलीस नाईक प्रवीण बर्गे, गणेश सावंत, राहुल घोरपडे, नंदकुमार सावंत, योगेश नार्वेकर, वैभव नार्वेकर, विशाल आलीम, निखिल माने, पोलीस हेड काॅन्स्टेबल जयवंत बगड, सहायक पोलीस फौजदार लक्ष्मण हरचकर यांचा गाैरव करण्यात आला.

यावेळी डाॅ. गर्ग यांनी पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावाही घेतला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थ, गांजा अशा विविध घटनांमधून आपल्याला मुक्त ठेवायचे आहे. अशा घटना जर कुठे घडत असतील त्यांच्यावर कारवाई ही आपण करायची आहे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.