Today's Horoscope - January 19, 2021: Avoid eating and drinking outside today | आजचे राशीभविष्य - 19 जानेवारी 2021 : आज बाहेरचे खाणे-पिणे टाळा

आजचे राशीभविष्य - 19 जानेवारी 2021 : आज बाहेरचे खाणे-पिणे टाळा

मेष - अत्यंत सावधपणे आजचा दिवस घालवा असा सल्ला श्रीगणेश देतात. सर्दी, खोकला आणि ताप यामुळे तब्बेत बिघडेल. स्वकीयांचा वियोग होईल. आणखी वाचा.

वृषभ - आज आपणावर श्रीगणेशाची पूर्ण कृपा राहील. परिवारात सुख आणि शांती राहील. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा.

मिथुन - श्रीगणेश कृपेने आज शारीरिक, मानसिक सुख चांगले मिळेल. नोकरी- व्यवसायात आपल्या कामाची प्रशंसा होईल. व्यापारी कामाची कदर करतील.  आणखी वाचा.

कर्क - आज आपण धर्म, ध्यान, देवदर्शन यात जास्त वेळ घालवाल असे श्रीगणेश सांगतात. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग येईल. शारीरिक व मानसिकदृष्टया प्रसन्न राहाल.   आणखी वाचा.

सिंह - आजचा दिवस प्रतिकूलतांचा आहे. तब्बेतीकडे अधिक लक्ष पुरवावे लागेल. बाहेरचे खाणे- पिणे टाळा. आजारामुळे खर्च करावा लागेल. आणखी वाचा.

कन्या - आजचा आपला दिवस अनुकूलतापूर्ण राहील. जीवनसाथी बरोबर जवळीकेच्या क्षणांचा आनंद घ्याल. दांपत्यजीवनात गोडी राहील. आणखी वाचा.

तूळ - घरात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. सुखदायक घटना घडतील. कामात यश आणि सफलता मिळेल. तब्बेत चांगली राहील.  आणखी वाचा.

वृश्चिक - तब्बेती विषयी थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे. शेअर- सट्टायात न पडण्याची सूचना श्रीगणेश देतात. आणखी वाचा.

धनु - शरीर आणि मनात उत्साहाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील. आईशी मतभेद होईल. आणखी वाचा.

मकर - दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्याने दिलासा मिळेल. गृहस्थी जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल. आणखी वाचा.

कुंभ - वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल असे श्रीगणेश सांगतात. वाद-विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. आणखी वाचा.

मीन - आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस चांगला आहे.  आणखी वाचा.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's Horoscope - January 19, 2021: Avoid eating and drinking outside today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.