शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

“अमित शाह म्हणजे गजनी, उद्धव ठाकरे मात्र रामशास्त्री बाण्याचे नेतृत्व”; शिवसेनेची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 1:33 PM

आता शिवसेनेकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर बोचरी टीका करण्यात आली आहे.

रायगड: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये जवळपास दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अनेकविध मुद्द्यांवरून दोन्ही पक्ष आमनेसामने येताना दिसत आहेत. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घेतली. यावेळी नक्षलग्रस्त भागाच्या समस्यांबाबतच्या बैठकीलाही उपस्थिती लावली. यानंतर आता शिवसेनेकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर बोचरी टीका करण्यात आली आहे. अमित शाह म्हणजे गजनी आहेत. याउलट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र रामशास्त्री बाण्याचे नेतृत्व आहे, असे म्हटले आहे. (shiv sena arvind sawant alleged that bjp leader and union home minister amit shah is ghajini)

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; सिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेश

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला असून, यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा आणि तर्क-वितर्कांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. मात्र, यानंतर अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. 

“राजसाहेब, भाजपशी युती करा, फायदा होईल”; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला!

अमित शाह हे गजनी आहेत

मैने ऐसे कोई बोला नहीं था, हा गजनीचा झटका त्यांना येतो. अमित शाह गजनी असतील, पण आमचे मुख्यमंत्री उद्धव मात्र रामशास्त्री बाण्याने काम करणारे आमचे नेतृत्व आहे, हे लक्षात ठेवा, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. भाजपने शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही, या गोष्टीकडे अरविंद सावंत यांचा रोख होता, असे सांगितले जात आहे. 

“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे, तेव्हा...”: देवेंद्र फडणवीस

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीत भेट झाली. केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही उपस्थित होते. याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी उपस्थित होते. तब्बल साडेतीन तास ही बैठक चालली. नक्षलग्रस्त भागात विकासाला गती मिळण्यासाठी केंद्र सरकारने या परिसरात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १२०० कोटींच्या निधीची मदत करावी, नक्षल प्रभावित भागांतील रस्ते व पूल बांधकाम प्रकल्पांना मंजुरी मिळावी. या भागातील लोकोपयोगी कामांसाठी वन अधिनियमांतर्गत पुढचे तीन वर्षांसाठी मुदत वाढ मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केली. 

टॅग्स :PoliticsराजकारणAmit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाArvind Sawantअरविंद सावंतBJPभाजपा