आयपीएल २०२६ स्पर्धेतील रविवारी लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. लखनौच्या इकाना स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात कोलकाताच्या संघाने रिंकूच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर १५५ धावा करत लखनौसमोर १५६ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना मोहम्मद शमीनं अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराच्या मदतीने लखनौ सुपर जाएंट्सनं सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. पण इथं शेवटी कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली.कोलकाता नाईट रायडर्सकडून सुपर ओव्हरमध्ये सुनील नरेनच्या फिरकीसमोर लखनौच्या फलंदाजांना निभाव लागला नाही. त्याने ३ चेंडूत अवघ्या एका धावेवर LSG चा खेळ खल्लास केला. सुपर ओव्हरमध्ये अवघ्या २ धावांचा पाठलाग करताना रिंकू सिंह याने पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार मारत कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला यंदाच्या हंगामातील दुसरा विजय मिळवून दिला.
Web Summary : KKR defeated LSG in a thrilling super over. Narine's spin restricted LSG to one run. Rinku's boundary sealed KKR's second victory this season at Lucknow's Ekana Stadium. A nail-biting finish!
Web Summary : केकेआर ने रोमांचक सुपर ओवर में एलएसजी को हराया। नरेन की फिरकी ने एलएसजी को एक रन पर रोका। रिंकू के चौके ने केकेआर को दूसरा जीत दिलाया। लखनऊ के इकाना स्टेडियम में रोमांचक मुकाबला!