शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 23:56 IST

सावंतवाडी मुंबई ठाणे येथे दाखल आहेत गुन्हे...

सावंतवाडी : शेअर्स मार्केट मधून जादा परतावा देतो म्हणून सांगून शंभर ते दीडशे कोटी रूपयांचा गंडा घालणाऱ्या सागर सुबोध कारिवडेकर  याला सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथून ताब्यात घेतले आहे. रविवारी सायंकाळी तो कारिवडे येथील आपल्या सासुरवाडीला आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात सापळा रचून नाट्यमयरित्या त्याला ताब्यात घेतले.कारिवडेकर यांच्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात पुणे येथील गुंतवणूकदारांच्या अंगावर गाडी घालत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे येथे ही फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.सहा महिन्यापूर्वी सावंतवाडी सर्वोदयनगर येथे शेअर्स मधील परताव्याची रक्कमेची विचारणा करण्यासाठी आलेल्या पुणे येथील पाच जणांवर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सागर कारिवडेकर यांच्यासह पाच जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील  शौनक सपकाळ रा. पुणे यांनी दिलेला तक्रारीवरून  तहा राजगुरू, तला राजगुरू राह   बांदा तसेच नितीन मेस्त्री र. कोलगाव या सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती तर सागर कारिवडेकर हा तेव्हापासून फरार होता.तो सावंतवाडी पोलिसांना हवा होता.तर  सावंतवाडीत घडलेल्या घटनेनंतर शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याच्या उद्देशाने आणखी काहि गुंतवणूक दाराना सागर कारिवडेकर याने गंडा घातला होता त्याच्या रक्कमेचा परतावा ही वेळेत दिला नव्हता त्यामुळेच या सर्व ठेवीदारांनी मुंबई ठाणे येथील पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या  होत्या या तक्रारींचा तपास ठाणे आर्थिक गुन्हा शाखा करत आहे. याप्रकरणी ठाणे येथील पोलिसांनी सागर कारिवडेकर याचा ठाणे पोलिसांकडून सावंतवाडीतील बंगला गाड्या तसेच सावंतवाडीसह वेगुर्ले येथील मालमत्ता ही जप्त केल्या होत्या.तसेच त्याची बॅक खातीही गोठवण्यात  आली होती.या गुन्ह्य़ाचा तपास ठाणे आर्थिक गुन्हा शाखा वेगाने करत आहे.त्यामुळेच सागर कारिवडेकर याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता.त्यातच रविवारी कारिवडेकर हा आपल्या सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील सासुरवाडीला येणार अशी माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, हवालदार महेश जाधव, महेश निरवडेकर यांच्या पथकाने सापळा रचून त्याला त्याला ताब्यात घेतले.सध्या त्याला सावंतवाडी पोलिसांकडून पुणे येथील तक्रारदार सकपाळ, देवकाते वगैरे गुंतवणूकदार यांच्यावर हल्ला प्रकरणी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fraudster promising high stock returns arrested in Sawantwadi after absconding.

Web Summary : Sagar Karivadekar, accused of a stock market scam involving crores, was arrested in Karivade. He faces charges including attempted murder and fraud across multiple cities. Police had seized his assets, and were actively searching for him.
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketस्टॉक मार्केटCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी