शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्हा स्वयंपूर्ण करायचा आहे - रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 02:31 IST

शेती व इतर क्षेत्राचा विकास करून त्या विकासाच्या माध्यमातून आपला रायगड जिल्हा स्वयंपूर्ण करायचा आहे, त्यासाठी अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरु वारी खांदेश्वर येथे केले.

पनवेल : शेती व इतर क्षेत्राचा विकास करून त्या विकासाच्या माध्यमातून आपला रायगड जिल्हा स्वयंपूर्ण करायचा आहे, त्यासाठी अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरु वारी खांदेश्वर येथे केले. कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या रायगड कृषी महोत्सव २०१८ व महिला बचत गट उत्पादने विक्र ी प्रदर्शनाचे उद्घाटन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी रवींद्र चव्हाण यांनी रायगडवासीय अनेक योजनांपासून वंचित आहेत, रायगडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्या योजना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणून जबाबदारी मोठी आहे, त्यामुळे रायगडवासीयांच्या प्रगतीसाठी काहीतरी करायला हवे यासाठी प्रयत्नशील असून जिल्ह्याच्या प्रगतीसाठी वेळ पडल्यास कटू निर्णय घेण्याचे संकेतही त्यांनी दिले. गावांमध्ये फेब्रुवारीनंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे गावांचे शहरांकडे स्थलांतर होते, ते प्रमाण कमी करण्यासाठी व गावांमध्ये समृद्धी आणण्यासाठी जिल्ह्याचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे, असे सांगतानाच अधिकाºयांनी लोकांशी संपर्कवाढवावा तसेच कामाचे टार्गेट ठेवून कृती आराखडा तयार करावा आणि वेळच्यावेळी कामे पूर्ण करावीत, अशा सूचनाही चव्हाण यांनी अधिकाºयांना दिल्या.या कार्यक्र मासाठी भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, उपाध्यक्ष आस्वाद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार दीपक आकडे, भाजपाचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकर आदींसह शेतकरी, नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड