शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

एक लाख ८६ हजार रुपयांचा गांजा कर्जतमध्ये हस्तगत; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:13 PM

आरोपींना २९ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

कर्जत : कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत साडेपंधरा किलो गांजा व वाहतूक करणारी गाडी, असा नऊ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींना २६ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, २९ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.कर्जत शहरातून नशाकारक अमली पदार्थांची वाहतूक होणार आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. पोमण, पोलीस हवालदार सुभाष पाटील, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस हवालदार हनुमंत सूर्यवंशी, पोलीस हवालदार स्वप्निल येरुणकर, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रशांत देशमुख यांनी कर्जत-पळसदरी रस्त्यावरील हॉटेल कर्जत किंग रेस्टॉरंट समोरील रोडवर सापळा लावला होता, त्या वेळी या रस्त्यावरून संशयित पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी नंबर एम-एच-४६ बी के १५१९ ही गाडी जात असताना पोलिसांनी गाडी अडवून तपासणी केली. गाडीमध्ये एक काळ्या रंगाचे पोते आढळून आले, त्यामध्ये गांजा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी गाडीतील अवदेश चंद्रशेखर वर्मा (३१, रा. कर्जत महावीर पेठ), मुन्नीलाल ललकारी राजभर (२५, सध्या रा. मुद्रे-कर्जत, मूळचा रा. बेहरी, उत्तर प्रदेश) अशा दोघांना ताब्यात घेतले आहे.याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास स्था. गु. अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. पोमण हे करीत आहेत.मंगळवारी रात्री केली कारवाईपोलिसांनी एक लाख ८६ हजार रुपयांचा गांजा व वाहतूक करणारी गाडी किंमत आठ लाख रुपये असा एकूण नऊ लाख ८६ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई २५ फेब्रुवारी रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास केली.