शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : सुरेश लाड यांचा अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 02:42 IST

१८९ कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये गुरु वारी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, या वेळी महाआघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्जत : १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये गुरु वारी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, या वेळी महाआघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार सुरेश लाड हे या वर्षी निवडणूक लढविणार नव्हते, तसे त्यांनी जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य सुधाकर घारे यांचे नाव पुढे येत होते. मात्र, शिवसेना-भाजप-आरपीआय युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व समविचारी पक्ष महाआघाडीकडे तगडा उमेदवार असणे गरजेचे आहे म्हणून आघाडीतील सर्वच पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार सुरेश लाड यांची मनधरणी केली. कार्यकर्त्यांच्या विनंती, आग्रहाला मान देऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तसे बुधवारीच राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केले होते.आमदार सुरेश लाड गुरु वारी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी भवन येथून प्रांत कार्यालयात निघाले, या वेळी आघाडीतील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते रॅलीत सामील झाले होते. प्रांत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांच्याकडे आमदार सुरेश लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी हनुमंत पिंगळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे, माजी तालुका अध्यक्ष अरविंद पाटील, शेकापचे तालुका चिटणीस प्रवीण पाटील, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष उत्तम जाधव, तानाजी चव्हाण, एकनाथ धुळे आदी उपस्थित होते.माणिक जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखलदासगाव : १९४ महाड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माणिक जगताप यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी माणिक जगताप यांनीदेखील शिवसेनेने केलेल्या शक्तिप्रदर्शनाला जोरदार प्रत्युत्तर दिले. अर्ज दाखल केल्यानंतर महाड शहरातून मिरवणूक काढली.उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जवळ येऊ लागल्याने गुरुवारी सकाळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार माणिक जगताप यांनी गुरु वारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे सादर केला. या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे तालुकाध्यक्ष मोहन खांबे, मुंबई महानगरपालिकेच्या गटनेत्या राखी जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नीलेश महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी महाड, माणगाव आणि पोलादपूर तालुक्यातील काँग्रेस, शेकाप आणि राष्ट्रवादी आघाडीचे कार्यकर्ते शहरात दाखल झाले होते. येथील सालवाड नाका येथून ढोल-ताशांचा गजर करत मिरवणूक निघाली.अपक्ष चंद्रकांत धोंडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखलमहाड : महाड विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत धोंडगे यांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रकांत धोंडगे हे मूळचे महाड तालुक्यातील बेबलघर येथील असून ते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे समर्थक मानले जातात. या वेळी कुणबी समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. महाड प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे अर्ज सादर केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019karjat-acकर्जत