शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये आंबा बागायती लागवडीसाठी प्रयत्न व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 23:39 IST

चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाल्याने शेतकरी अडचणीत

- श्रीकांत नांदगावकर   लोकमत न्यूज नेटवर्कतळा : रायगड जिल्ह्यात चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या आंबा बागायती पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी शासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न होणे गरजेचे आहे.रायगड जिल्ह्यात जवळपास आठ हजार ७९ हेक्टरवर आंबा बागायतीचे नुकसान झाले. यावर्षी आंबाही ४० टक्के लागला असल्याची माहिती कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी दिली. येथील शेतकरी भातपिकांबरोबरच आंबा हे पीक उत्पादन घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत; पण आता या शेतकऱ्यांना आर्थिक साधन काहीच उरलेले नाही.शासनाकडून या चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या आंबा बागायतदार शेतकरी बांधवांना प्रतिझाडामागे फक्त ५०० रुपये देऊन सहानुभूती दाखवली गेली आहे; परंतु या शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत ही लागवड न देता राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत बागा पुन्हा लागवडीखाली आणून शेतकरी सक्षम कसा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.ही आंबा बागायती शेती करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी खड्डे खोदणे, लागवड करणे, कुंपण करणे, त्याचबरोबर किमान तीन वर्षे पाणी देणे, सावली करणे, खत देणे, फवारणी करणे, अशी कितीतरी कामे करावी लागतात. ही कामे रोजगार हमी योजनेंतर्गत लागवड करून पैसे मिळत नाही. शिवाय त्यासाठी जमीन दोन हेक्टरची मर्यादा असते. म्हणून शासनाने या शेतकऱ्यांना मोठ्या योजनेत बसवून लागवडीला प्रोत्साहन द्यावे. जेणेकरून शेतकरी ही लागवड करू शकेल. त्याला तशी आर्थिक मदत मिळेल व गेलेल्या बागा पुन्हा उभारी घेतील. यासाठी अधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

तळा तालुक्यात ६२० हेक्टरवर आंबा लागवड असून, निसर्ग वादळाने ३११.३६ हेक्टरचे आंबा बागायतीचे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्याचे ठरविले आहे. लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान दिले जाणार आहे. तशी यावर्षीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.    - सागर वाडकर, मंडळ अधिकारी

आंबा बागायती निसर्गाच्या कोपाने उद्ध्वस्त झाल्या; परंतु त्या पुन्हा लागवडीखाली आणून शेतकरी सक्षम बनविणे गरजेचे आहे. राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यासाठी प्रयत्न केला तरच शेतकरी बांधव यासाठी तयार होतील.    - मारुती वरंडे, आंबा बागायतदार

चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या आंबा बागायतदारांना प्रतिझाडामागे ५०० रुपये देऊन १५ वर्षांचे झाड कायमचे गेले तर यासाठी झालेली मेहनत लक्षात घेता ही लागवड राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत बसवून शेतकरी बांधवांना आर्थिक आधार द्यावा.- कृष्णा चाळके, नुकसानग्रस्त शेतकरी.