शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

पंचवीस किल्ले दत्तक द्या, संभाजीराजेंची सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 19:37 IST

मुंबईत बसून टीकाटिप्पणी नको; एक पैसाही नको, तो आम्ही उभा करू..

अलिबाग-कोल्हापूर : सरकारला हात जोडून विनंती करतो, राज्यातील २५ किल्ले दत्तक द्या. हा शिवाजी महाराजांचा शिवभक्त वारसदार आपले वेगळेपण दाखवून देईल, असा विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महाेत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी ते बोलत होते. यासाठी एक पैसाही देऊ नका. ते आम्ही उभे करू. अशक्य ते शक्य करण्याची धमक या संभाजी छत्रपतीमध्ये आहे, असाही दावा त्यांनी केला.

ते म्हणाले, राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा. सध्याच्या स्थितीत दहशतवाद वाढू लागला आहे, महिलांवर अन्याय होऊ लागले आहेत, जातीयवाद वाढत आहे. अशा परिस्थितीत अभ्यासक्रमामध्ये शिवरायांच्या गाथेचा समावेश झाला पाहिजे. या रायगडावर महाराजांना शोभणाऱ्याच गोष्टी राहतील. जिल्हा प्रशासन आणि शिवभक्तांचे आभार मानत असताना संभाजीराजे यांनी आपण पुढच्यावर्षी तुमच्यासोबत तंबूत राहणार असल्याचे सांगितले.

राजसदरेचे पुरावे उपलब्ध..

छत्रपती शिवाजी महाराज राजसदरेच्या पाठीमागील बाजूस राहत होते. याचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे पुरातत्व खात्याने आता आम्हांला राजसदरेचे राजवैभव पुन्हा उभारण्यासाठी परवानगी द्यावी.

शिवरायांविषयी अनुदगार, निर्णय घ्या

कोणी भाषणातून, कोणी नाटकातून शिवाजी महाराजांविषयी अनुद्गार काढतो. परंतु, हे बंद झाले पाहिजे. यांना शिस्त नको का लावायला. कोणी काही बोलले तर एक पक्ष त्याची बाजू घेतो. म्हणून दुसरा दुसरी बाजू घेतो, हे चालणार नाही. शासनाने एक समिती करावी. स्मारक ग्रंथ करावा जाे सर्वांसाठी बंधनकारक राहील, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

मुंबईत बसून टीकाटिप्पणी नको

काहीजण मुंबईत मला टार्गेट करीत आहेत. माझ्यावर टीकाटिप्पणी करीत आहेत. त्यांनी रायगडावर येऊन पाहावं. माझ्यासोबत दोन दिवस राहून काम बघावं. हे काही पुलाचे आणि डांबरी रस्त्याचे काम नाही. हे किल्ले संवर्धनाचे काम आहे, असा टोलाही संभाजीराजे यांनी लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaigadरायगडShivrajyabhishekशिवराज्याभिषेकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीFortगडGovernmentसरकार