शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; कंटेनरची तीन वाहनांना धडक; 3 जणांचा मृत्यू          

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 19:55 IST

Accident on Mumbai-Pune Expressway : कंटेनरने धडक दिल्यानंतर आय टेन पूर्ण जळून खाक झाली. कंटेनर चालक जखमी झाला असून त्याला एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नितीन भावे                                                                                                                                                  खोपोली - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किलोमीटर ३८ जवळ आडोशी गावच्या हद्दीत मुंबई लेनवर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने आय टेन, इरटिगा आणि ट्रक या तीन वाहनांना धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात आय टेनमधील एकाच कुटुंबातील आई-वडील आणि ४ वर्षाचा मुलगा या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडला. कंटेनरने धडक दिल्यानंतर आय टेन पूर्ण जळून खाक झाली. कंटेनर चालक जखमी झाला असून त्याला एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये जोक्विन चेटियार(३६), लुईझा चेटियार (३५) आणि डॅरील चेटियार (४) रा.नायगाव, मुंबई यांचा समावेश आहे.

लग्नाहून परतत होते चेटियार कुटुंबीय

लुईझा यांचे वडील जॉन रॉड्रिग्ज रा. अंधेरी यांची गाडीही त्यांच्या मागेच होती. आपल्या मुलीचा, जावयाचा आणि नातवाचा आपल्या डोळ्यादेखत मृत्यू झाल्याचे पाहून त्यांच्या दुःखाला पारावार राहिला नव्हता. आपल्या मुलाचे काल पुण्याला लग्न होते. लग्नाचा कार्यक्रम झाल्यानंतर आज दुपारी दोन वाजता पुण्याहून निघालो. कंटेनरने जोरामध्ये आपल्या गाडीलाही कट मारला आणि थोड्याच वेळात समोर आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या गाडीला धडक दिल्याचे जॉन रॉड्रिक्स यांनी 'लोकमत' जवळ बोलताना सांगितले. 

आपल्या चार वर्षांचा नातवाचा नायगावच्या डॉन बॉस्को शाळेमध्ये आजच ऑनलाईन इंटरव्यू झाला होता. एक आयुष्य सुरू होण्याच्या अगोदरच मृत्यूने त्याला कवटाळल्यामुळे आपल्या नातवाच्या आठवणीने आजोबा जॉन रॉड्रिग्ज यांना अश्रू अनावर झाले होते. अपघाताचे वृत्त समजताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, आय आर बी, डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साटेलकर, विजय भोसले, भक्ती साटेलकर यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मदत कार्य केले आणि वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू