मावळ तालुक्यातील पवनानगर परिसरात तरुणाचा जाळून खून; दुचाकीसह मृतदेह आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 17:23 IST2026-04-28T17:22:42+5:302026-04-28T17:23:14+5:30

अज्ञात व्यक्तींनी तरुणाचा खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह व दुचाकी जाळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे

Youth burnt to death in Pawananagar area of Maval taluka; Excitement as body found with two-wheeler | मावळ तालुक्यातील पवनानगर परिसरात तरुणाचा जाळून खून; दुचाकीसह मृतदेह आढळल्याने खळबळ

मावळ तालुक्यातील पवनानगर परिसरात तरुणाचा जाळून खून; दुचाकीसह मृतदेह आढळल्याने खळबळ

पवनानगर: मावळ तालुक्यातील पवनानगर परिसरात एका तरुणाचा दुचाकीसह जाळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

ही घटना दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास महागाव–धालेवाडी रस्त्यालगत असलेल्या एका शेतात उघडकीस आली. स्थानिक नागरिकांना जळालेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. मृत तरुणाची ओळख अमोल अनंता मोहोळ (वय ३७, रा. वारू, ता. मावळ, जि. पुणे) अशी झाली आहे. घटनास्थळी मृतदेह पूर्णतः जळालेल्या अवस्थेत आढळून आला असून, मृतदेहाजवळ दुचाकीही जळालेल्या स्थितीत आढळली.

प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी तरुणाचा खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह व दुचाकी जाळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणातील खुनामागील नेमके कारण काय, तसेच आरोपी कोण आहेत, याचा शोध घेण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास हाती घेतला आहे.

Web Title : मावल में युवक की जलाकर हत्या; बाइक के साथ शव बरामद

Web Summary : मावल के पवनानगर में एक युवक की मोटरसाइकिल सहित जलाकर हत्या कर दी गई। महागांव-धालेवाड़ी रोड के पास एक खेत में शव मिलने के बाद पुलिस मामले की जांच कर रही है। मृतक की पहचान अमोल मोहोल, उम्र 37 वर्ष के रूप में हुई है। पुलिस को सबूत नष्ट करने के लिए शव और बाइक को जलाने का संदेह है।

Web Title : Youth Murdered and Burned in Maval; Body Found with Bike

Web Summary : A youth was murdered and burned along with his motorcycle in Pavananagar, Maval. Police are investigating the crime after the charred body was discovered in a field near Mahagaon-Dhalewadi road. The victim was identified as Amol Mohol, age 37. Police suspect the body and bike were burned to destroy evidence.