'तू आमचे डेबिट कार्ड घेतले आहे', झडती घेण्याचा बहाणा; ४० हजारांची रोकड लुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 15:38 IST2026-04-21T15:36:24+5:302026-04-21T15:38:32+5:30

चोरट्यांनी धमकावण्यास सुरुवात केली, तरुणाची झडती घेण्याचा बहाणा करत त्याच्या खिशातील ४० हजारांची रोकड काढून घेतले

'You took our debit card', excuse for search; Rs 40,000 cash looted | 'तू आमचे डेबिट कार्ड घेतले आहे', झडती घेण्याचा बहाणा; ४० हजारांची रोकड लुटली

'तू आमचे डेबिट कार्ड घेतले आहे', झडती घेण्याचा बहाणा; ४० हजारांची रोकड लुटली

पुणे : सुरक्षारक्षकाकडे झडती घेण्याचा बहाणा करून ४० हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना पाषाण परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शमसुद्दीन उर्फ समीर चाँदसाहेब ककेरी (वय २६, सध्या रा. कीर्ती गार्डन, पाषाण, मूळ रा. कर्नाटक) याने बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ककेरी पाषाण परिसरात सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. १२ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ककेरी आणि त्याचा मित्र पाषाणमधील सुतारवाडी परिसरातून पायी निघाले हाेते. त्या वेळी दोन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ककेरी आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला अडवले. तू आमचे डेबिट कार्ड घेतले आहे, असे सांगून चोरट्यांनी त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी ककेरीची झडती घेण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्याच्या खिशातील ४० हजारांची रोकड काढून घेतले. ककेरीने आरडाओरडा केला. खिशातील रोकड लुटून चोरटे पसार झाले.

ककेरीने गावाला पैसे पाठवण्यासाठी रोकड काढून खिशात ठेवली होती. त्याच्याकडील रोकड लुटण्याची घटना घडल्यानंतर तो घाबरला होता. त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. सहायक पोलिस निरीक्षक डाबेराव पुढील तपास करत आहेत.

Web Title : तलाशी का बहाना, नकदी लूटी: 'तुमने हमारा डेबिट कार्ड लिया'।

Web Summary : पुणे के पाषाण में, तलाशी लेने का नाटक करते हुए चोरों ने एक सुरक्षा गार्ड से ₹40,000 लूट लिए, और उस पर डेबिट कार्ड चुराने का झूठा आरोप लगाया। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Pretending to search, cash looted: 'You took our debit card'.

Web Summary : In Pashan, Pune, thieves posing as searchers stole ₹40,000 from a security guard by falsely accusing him of stealing a debit card. Police are investigating.