शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी वृद्धास लुटणारा चोरटा जेरबंद

By admin | Updated: April 6, 2015 05:32 IST

येथे करमाळा-पुणे एसटी बसमध्ये सहप्रवासी वृद्धास चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन लुबाडणाऱ्या चोरट्यास ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले.

भिगवण : येथे करमाळा-पुणे एसटी बसमध्ये सहप्रवासी वृद्धास चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन लुबाडणाऱ्या चोरट्यास ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या आपल्या नातूची भेट घेण्यासाठी दत्तात्रय दगडू पाटील (वय ६५, रा. घारगाव, ता. करमाळा) पुण्याकडे बसने निघाले होते. राशीनमध्ये त्यांच्याशेजारी सुरेश मोहनसिंग भाठी (वय ५३, रा. उरुळी कांचन) भिगवणचे तिकीट काढून बसला. राशीनपासून गाडी पुढे निघाल्यानंतर भाठी याने आपल्याजवळ असणारे चॉकलेट खाण्यासाठी काढून त्यातील एक सहप्रवासी पाटील यांना दिले. चॉकलेट खाल्ल्याने थोड्या वेळेत पाटील यांना गुंगी आली. तोपर्यंत गाडी भिगवण येथे येऊन थांबली असता, बसमधील अन्य प्रवासी चहा-पाण्यासाठी खाली उतरल्यानंतर भाठी याने पाटील यांचा खिसा चाकूने कापीत खिशातील रोख रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्याच गाडीतून प्रवास करीत असलेल्या अझरुद्दीन पठाण, शब्बीर मुलाणी, तसेच नसिबा मुलाणी यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी आरडाओरडा करताच भाठी याने धूम ठोकली. त्याच वेळी भिगवण पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रमेश भोसले, शिवाजी काटे, संदीप लोंढे यांना हा प्रकार समजल्याने त्यांनी चोरट्याचा पाठलाग केला. भिगवण ग्रामस्थांच्या मदतीने चोरट्यास जेरबंद करण्यात आले. तसेच पाटील यांना उपचारासाठी भिगवण येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. (वार्ताहर)