"प्रमोशन मिळवण्यासाठी साहेबांसोबत...", बँक अधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्याला नको ती ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 11:28 IST2023-07-27T11:27:54+5:302023-07-27T11:28:01+5:30

बँकेत अधिकारी पदावर असलेल्या एका व्यक्तीने बँकेतच काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसोबत अश्लील वर्तन

With boss to get promotion Unwanted offer of bank officer to female employee | "प्रमोशन मिळवण्यासाठी साहेबांसोबत...", बँक अधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्याला नको ती ऑफर

"प्रमोशन मिळवण्यासाठी साहेबांसोबत...", बँक अधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्याला नको ती ऑफर

किरण शिंदे  

पुणे : पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कॅम्प परिसरातील एका नामांकित बँकेत अधिकारी पदावर असलेल्या एका व्यक्तीने बँकेतच काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसोबत अश्लील वर्तन केले आहे. याप्रकरणी एका 38 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार या बँक अधिकाऱ्याविरोधात भादवी 354अ, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला ही कॅम्प परिसरातील या बँकेत कामाला आहे. तर आरोपी हा फिर्यादींचा बॉस आहे. आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या मुलींना उशिरापर्यंत कामावर थांबून ठेवायचा. न ऐकणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना तो कामावरून काढून टाकण्याची धमकी देत असतील भाषेत शिवीगाळ करायचा. 

इतकेच नाही तर आरोपीने फिर्यादीला प्रमोशन मिळवण्यासाठी एखाद्या साहेबांसोबत झोपावे लागते असे बोलून फिर्यादीच्या अंगाला घाणेरडा स्पर्श केला. या संपूर्ण घटनेनंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: With boss to get promotion Unwanted offer of bank officer to female employee