शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे भुज’बळ’ भाजपसोबत जाणार ? पुण्यातील वक्तव्याने राजकीय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:04 IST

भुजबळ यांनी भाजपची उघड स्तुती केल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत

पुणे - मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजपबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना भुजबळ यांनी थेट भाजपच्या धोरणांचं समर्थन करताना “फुले-शाहू-आंबेडकरांना भाजप मान्य करायला लागला आहे, ओबीसींना ते सपोर्ट करत असतील तर मला काही अडचण नाही” असं विधान केलं.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित आठव्या युवा संसदेमध्ये २ रा संसद कट्टा अंतर्गत विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.  यादरम्यान, लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी पुण्यात आयोजित या कार्यक्रमात छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. “तुफानांमध्ये जायचं आहे आणि लढायचं आहे… मी ठरवेन काय करायचं” असं म्हणत भुजबळ यांनी राजकीय भविष्यासंदर्भात मोठा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे भुज’बळ’ भाजपसोबत जाणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत.भाजपसोबत काम करण्यास मला काहीच अडचण नाही, असं थेट सांगणाऱ्या भुजबळ यांनी मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर सातत्याने नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता त्यांनी भाजपची उघड स्तुती केल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत. राज्यातील आगामी राजकीय समीकरणांवर यामुळे मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. भुजबळांचा पुढील निर्णय कोणता असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडChagan Bhujbalछगन भुजबळBJPभाजपाAjit Pawarअजित पवार