शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; हातात कापलेले मुंडके घेऊन जाणाऱ्या पतीला ११ वर्षांनी जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 10:40 IST

आरोपीने न्यायालयात असा बचाव केला होता की, हा गुन्हा दुसऱ्या कोणीतरी केला असून, आपण केवळ भीतीपोटी मुंडके आणि कुऱ्हाड घेऊन पोलिस ठाण्यात जात होतो

पुणे: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचे मुंडके, हात आणि पाय कुऱ्हाडीने तोडून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील जोशी यांनी हा आदेश दिला.

रामचंद्र शेहू चव्हाण (वय ७४, रा. गंगा ओशियन पार्क सोसायटीसमोर, भारती विद्यापीठ परिसर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी सोनाबाई रामचंद्र चव्हाण (वय ५५) यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी या प्रकरणात एकूण २४ साक्षीदार तपासले. यामध्ये आरोपीची सून सुनीता चव्हाण ही मुख्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. तिने डोळ्यांदेखत आपल्या सासूवर झालेला हल्ला पाहिला होता. मयताचे रक्त तिच्या कपड्यांवरही उडाले होते. यात तिची साक्ष महत्त्वाची ठरली. याशिवाय, शेजारच्या इमारतीमधील एका रहिवाशाने आपल्या बाल्कनीतून ही घटना पाहिली होती. तसेच रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने आरोपी कापलेले मुंडके घेऊन जात असतानाचा व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला होता. विशेष म्हणजे, हा साक्षीदार नोकरीनिमित्त जपानमध्ये असतानाही न्यायालयाने जपानमधून त्याची साक्ष नोंदवून घेतली. एका ५ वर्षांच्या चिमुरडीनेही 'अण्णा' (आरोपी) ला ओळखले.

आरोपीने न्यायालयात असा बचाव केला होता की, हा गुन्हा दुसऱ्या कोणीतरी केला असून, आपण केवळ भीतीपोटी मुंडके आणि कुऱ्हाड घेऊन पोलिस ठाण्यात जात होतो. फिर्यादीने (सूनबाईने) आरोपीविरुद्ध खोटी फिर्याद दिली. आरोपीचा बचाव न्यायालयाने अमान्य केला. मात्र, सरकारी वकिलांनी तांत्रिक पुरावे रक्ताचे नमुने, फॉरेन्सिक अहवाल आणि आरोपीने रस्त्यात एका महिलेला दिलेल्या कबुलीचा आधार घेत गुन्हा सिद्ध केला. न्यायालयाने आरोपीचा बचाव फेटाळून लावत त्याला दोषी ठरविले.

काय आहे प्रकरण?

ही घटना ९ ऑक्टोबर २०१५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका मोकळ्या जागेत घडली होती. आरोपी रामचंद्र चव्हाण हा सुरक्षारक्षक (वॉचमन) म्हणून काम करायचा. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्यांच्यात सतत वाद व्हायचे. घटनेच्या दिवशी आरोपीने आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्याने केवळ तिची हत्याच केली नाही, तर तिचे मुंडके, दोन्ही हात आणि दोन्ही पाय शरीरापासून वेगळे केले. यानंतर आरोपी पत्नीचे कापलेले मुंडके आणि कुऱ्हाड घेऊन रस्त्यावरून चालत निघाला होता, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

'बायकोला मारले' आरोपीने दिलेला कबुलीजबाब न्यायालयात सिद्ध

घटनेनंतर आरोपी एका हातात मुंडके (त्यातून रक्त गळत असलेले) व दुसऱ्या हातात कुऱ्हाड घेऊन चालला होता. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेने आरोपीला विचारले की 'अण्णा कुठे बकरू कापले?' त्यावेळी आरोपी म्हणाला, 'बायकोला मारले'. आरोपीने महिलेला दिलेला कबुलीजबाब सरकारी पक्षाने न्यायालयात सिद्ध केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Husband gets life for wife's murder over character suspicion.

Web Summary : Pune: A man was sentenced to life imprisonment for brutally murdering his wife over suspicion of infidelity. He severed her head, hands, and legs. The court also imposed a fine of ₹5,000.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याCourtन्यायालयhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिसDeathमृत्यूjailतुरुंग