Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...

मिशेल मार्शसह पंत आणि पूरनची तुफान फटकेबाजी अन्...

By सुशांत जाधव | Updated: May 7, 2026 22:55 IST

Open in App

Lucknow Super Giants vs Royal Challengers Bengaluru, 50th Match : लखनौच्या एकाना स्टेडियमवर मिचेल मार्शचं वादळी शतक आणि निकोलस पूरन आणि कर्णधार रिषभ पंतने केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी १-१ षटक कमी केल्यावर १९ षटकांत ३ बाद २०९ धावा केल्या. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला २१० नव्हे तर २१३ धावांचे टार्गेट देण्यात आले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

RCB ला २१० ऐवजी २०१३ धावांच टार्गेट का मिळालं?

लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील  सामना पावसाच्या व्यत्ययामुळे वारंवार थांबवण्याण्यात आला होता. परिणामी १५ षटकांच्या खेळानंतर हा सामना प्रत्येकी १९-१९ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळेच डकवर्थ लुईस नियमानुसार, लखनौच्या संघाला लखनौने केलेल्या धावांचा विचार करुन २१३ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. 

Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला

पहिल्यांदा फलंदाजी करताना मिचेल मार्श आणि अर्शिल कुलकर्णी या जोडीनं लखनौ सुपर जाएंट्सच्या डावाची सुरुवात केली. यंदाच्या हंगामात सलामीवीराच्या रुपात  लखनौच्या संघानं सलामीचा आजमावलेला हा पाचवा प्रयोग ठरला. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी रचली. हंगामात पहिल्यांदाच पॉवर प्लेमध्ये विकट न गमावता लखनौनं धमाकेदार अंदाजात सुरुवात केली.  अर्शिन कुलकर्णी  २४ चेंडूत १७ धावा करून बाद झाला. दुसऱ्या बाजूला मिचेल मार्शनं आपली धमाकेदार खेळी कायम ठेवली. त्याने ५६ चेंडूत ९ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ५६ चेंडूत १११ धावांची खेळी केली. निकोलस पूरन याने २३ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३८ धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकात रिषभ पंतचाही जलवा पाहायला मिळाले. त्याने १० चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३२० च्या स्ट्राइक रेटसह नाबाद ३२ धावांची खेळी करत संघाच्या धावफलकावर २०९ धावा लावल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Marsh's Century, LSG scores 202, RCB target 213 due to rain.

Web Summary : Mitchell Marsh's century, alongside Pooran and Pant's explosive batting, propelled LSG to 209 in 19 overs. Rain interruptions led to a revised target of 213 for RCB via the Duckworth-Lewis method.
टॅग्स :आयपीएल २०२६लखनौ सुपर जायंट्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोररिषभ पंत