Lucknow Super Giants vs Royal Challengers Bengaluru, 50th Match Result: मिचेल मार्शच्या विक्रमी शतकी खेळीनंतर प्रिन्स यादवच्या भेदक माऱ्यासह मोक्याच्या क्षणी दिग्वेश राठीनं केलेल्या उत्तम गोलंदाजीच्या जोरावर लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने घरच्या मैदानात ९ धावांनी विजय नोदवला. गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला रोखत LSG नं स्पर्धेतील आपले आव्हान जर-तरच्या समीकरणासह अजूनही कायम ठेवलं आहे. अखेरच्या षटकात २० धावांचा बचाव करताना कर्णधार रिषभ पंतने दिग्वेश राठीकडे चेंडू सोपवण्याचा धाडसी निर्णय घेतला. रोमारियो शेफर्डसारखा धोकादायक फलंदाज समोर असतानाही या फिरकीपटूने केवळ १० धावा देत संघाचा विजय निश्चित केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिचेल मार्शचं विक्रमी शतक अन् पूरन-पंतचा धमाका
पहिल्यांदा फलंदाजी करताना मिचेल मार्श आणि अर्शिन कुलकर्णी या जोडीनं लखनौ सुपर जाएंट्सच्या डावाची सुरुवात केली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी रचली. अर्शिन कुलकर्णी २४ चेंडूत १७ धावा करून बाद झाला. दुसऱ्या बाजूला मिचेल मार्शनं ५६ चेंडूत ९ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ५६ चेंडूत १११ धावांची विक्रमी शतकी खेळीसह संघाला मजबूत स्थितीत नेले. निकोलस पूरन याने २३ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३८ धावांची उपयुक्त खेळी केल्यावर अखेरच्या षटकात रिषभ पंते १० चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३२० च्या स्ट्राइक रेटसह नाबाद ३२ धावांची खेळीसह १९ षटकांत धावफलकावर ३ विकेट्सच्या मोबदल्यात २०९ धावा लावल्या होत्या. आरसीबीच्या संघाकडून जोश हेजलवूड, क्रुणाल पांड्या आणि रसिख सलाम यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
विराटसह जेकब बेथल स्वस्तात माघारी
पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी १९-१९ षटकांच्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला २१३ धावांचे लक्ष्य मिळाले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना मोहम्मद शमीनं जेकब बेथल याला पहिल्याच षटकात ४ धावांवर माघारी धाडले. दुसऱ्या षटकात प्रिन्स यादवनं विराट कोहलीला खाते न उघडता देता तंबूत धाडले. या दोन षटकात RCB चा संघ बॅकफूटवर ढकलला गेला.
रजत पाटीदारचे अर्धशतक
सलामीवीर स्वस्तात माघारी फिरल्यावर देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार रजत पाटीदार जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५३ चेंडूत ९५ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. RCB च्या डावातील ११ व्या षटकात प्रिन्स यादव पुन्हा पिक्चरमध्ये आला. त्याने सेट झालेल्या देवदत्त पडीक्कल याला २५ चेंडूत ३५ धावांवर बाद केले. याच षटकात जितेश शर्माच्या रुपात त्याने संघाला आणखी एक यश मिळवून दिले. अर्धशतकी खेळी करणाऱ्या रजत पाटीदारच्या ३१ चेंडूतील ६१ धावांच्या खेळीला शाहबाझ अहमदने ब्रेक लावला. एवढेच नाही तर १७ चेंडूत ४० धावा करणाऱ्या टीम डेविडची महत्त्वपूर्ण विकेट घेत या फिरकीपटूनं सामना LSG च्या बाजूनं फिरवला. अखेरच्या षटकात क्रुणाल पांड्या २८ (१६) आणि रोमारियो शेफर्ड २३ (१५) जोडीनं सामन्यात ट्विस्ट आणला. पण शेवटच्या षटकात २० धावा करण्यात ते कमी पडले आणि RCB च्या संघाला ९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. लखनौकडून प्रिन्स यादवनं सर्वाधिक ३ तर शाहबाझ अहमद याने २ आणि मोहम्मद शमीनं एक विकेट घेतली.
Web Summary : Lucknow Super Giants kept their playoff hopes alive by defeating RCB. Marsh's century and Yadav's bowling were key. Rathi's final over heroics secured the win, defending 20 runs against Shepherd and justifying the captain's faith.
Web Summary : लखनऊ सुपर जायंट्स ने आरसीबी को हराकर प्लेऑफ की उम्मीदें बरकरार रखीं। मार्श का शतक और यादव की गेंदबाजी महत्वपूर्ण रही। राठी के अंतिम ओवर के पराक्रम ने शेफर्ड के खिलाफ 20 रनों का बचाव करते हुए कप्तान के भरोसे को सही ठहराया।