शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

का घालण्यात आली होती संभाजी पुलावर दुचाकीला बंदी ; वाचा रंजक इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 21:22 IST

संभाजी पुलावरुन दुचाकी वाहनांना जाण्यास बंदी घालण्याचा आदेश तत्कालीन अपर पोलीस आयुक्तांनी ७ एप्रिल १९९४ रोजी काढलेल्या आदेशानुसार घालण्यात आले होते़.  त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे़. 

विवेक भुसेपुणे : संभाजी पुलावरुन दुचाकी वाहनांना जाण्यास बंदी घालण्याचा आदेश तत्कालीन अपर पोलीस आयुक्तांनी ७ एप्रिल १९९४ रोजी काढलेल्या आदेशानुसार घालण्यात आले होते़.  त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे़.          पुणे महापालिकेने संभाजी पुलाला समांतर सायकलींसाठी दोन पुल बांधण्याचा निर्णय घेतला होता़.  हा निर्णय १९८०च्या दरम्यान घेण्यात आला होता़ त्यानुसार काकासाहेब गाडगीळ पुल (झेड ब्रिज) आणि पुना हॉस्पिटलजवळील यशवंतराव चव्हाण पुल यांचे बांधकाम सुरु झाले़, पण हे बांधकाम विविध कारणांमुळे वर्षानुवर्षे रेंगाळले़.  त्या दरम्यान, सर्वाधिक सायकलीच्या शहरातून गायब होऊ लागल्या होत्या व दुचाकींची संख्या वेगाने वाढू लागली होती़. कालांतराने या दोन्ही पुलांचे बांधकाम पुर्ण झाले़. तरीही लोकांना सवय असल्याने लोक या दोन्ही पुलावरुन जाण्याऐवजी संभाजी पुलावरुनच जात होते़. कोथरुडचा विकास वेगाने होत असल्याने सर्व जण या पुलाचा वापर शहराच्या दुसरी बाजूला येण्यासाठी करत असत़. त्यामुळे या पुलावर वाहतूक कोंडी होऊ लागली होती़. पुलावरील वाहनांची संख्या कमी व्हावी व या दोन्ही पुलांचा वापर व्हावा, या हेतूने १९९४ मध्ये संभाजी पुलावरुन दुचाकी वाहनांना जाण्यास बंदी करण्यात आली़ त्यात रात्री साडेनऊ ते सकाळी सात यावेळेत सुट देण्यात आली होती़.           वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने जरी हा निर्णय घेतला असला तरी त्याचा वाहतूक पोलीस गैरफायदा घेऊ लागले़.  एखादा दुचाकीस्वार चुकून या पुलावर गेला तर त्याला पुलाच्या सुरुवातीला कोणी अडवत नसत़ पण दुसऱ्या टोकाला गेल्यावर तो पोलिसांच्या तावडीत सापडत असे़.  त्यातून अनेकांवर दंडात्मक कारवाई होत असे़. त्याचबरोबर वाहनचालकांकडून चिरीमिरी घेण्याचे एक नवे साधन वाहतूक पोलिसांना मिळाले होते. त्याच्या असंख्य तक्रारी कायमच येत असत़ त्यातून अनेक तक्रारी या वरिष्ठांपर्यंत नेहमी जात होत्या़. ही बंदी उठविण्यात येणार असल्याने आता या तक्रारीही बंद होतील.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीhistoryइतिहास