शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला व्हॅक्सिन नको, आसाराम बापूंना सोडा; फलक दर्शविणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 21:08 IST

आसाराम बापू हे गेली ७ वर्षे जोधपूर तुरुंगात आहेत. मानवतेच्या मुदद्यावर त्यांची मुक्तता करावी अशी होती मागणी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिरम इन्स्टिट्युट भेटीच्या वेळी युवा सेवा संघाच्या तिघा कार्यकत्यांनी फलक दर्शवत आसाराम बापू यांना सोडण्याची मागणी केली. पोलिसांनी त्या तिघांना तातडीने ताब्यात घेतले. 

ऋषिकेश सुहास देवरे, संतोष हिरालाल शेजव आणि संतोष देवरे अशी त्यांची नावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाच्यावेळी हे तिघे सिरम इन्स्टिट्यूटच्या समोरील बाजूला हातात फलक घेऊन उभे राहिले. हे पाहताच तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील फलक काढून घेतला. त्यांच्याकडे काही पत्रकेही होती. आसाराम बापू हे गेली ७ वर्षे जोधपूर तुरुंगात आहेत. मानवतेच्या मुदद्यावर त्यांची मुक्तता करावी, अशी त्यांची मागणी होती.

पंतप्रधान रस्ता मार्गे विमानतळाला रवाना
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर सायंकाळी विमानतळावर जाण्यासाठी रस्ते मार्गाचा वापर केला. नियोजनाप्रमाणे लोहगाव विमानतळावरुन सिरमला जाऊन येण्यासाठी ते हेलिकॉप्टरचा वापर करणार होते. मात्र सूर्यास्त झाल्यानंतर अंधार पडल्याने विमानतळ गाठण्यासाठी मोदींनी हेलिकॉप्टरऐवजी चारचाकी वाहनाचा वापर केला.

पंतप्रधान मोदी हे सायंकाळी पावणेपाच वाजता वायुसेनेच्या विशेष विमानाने पुण्यात दाखल झाले. तेथून हेलिकॉप्टरने मांजरी येथील हेलिपॅडवर त्यांचे आगमन झाले. सुमारे तासभर ते या ठिकाणी होते. त्यानंतर पंतप्रधानांचा ताफा रस्त्याने विमानतळाकडे रवाना झाला.

यावेळी शहर पोलीस दलाने या पर्यायी मार्गावर कडक बंदोबस्त ठेवला होता. लोहगाव विमानतळवरील टेक्निकल एअरपोर्ट तसेच मांजरी येथील हेलिपॅड येथे बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच तेथून सिरम इन्स्टीट्युटच्या मार्गावर सर्वत्र अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या निगराणीखाली पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीAsaram Bapuआसाराम बापूcorona virusकोरोना वायरस बातम्याjailतुरुंग