बुधवार पेठेत स्वेच्छेने देहविक्रय; ५ बांगलादेशी महिला ताब्यात, गेल्या २ वर्षात १३० बांगलादेशी मायदेशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 16:51 IST2026-05-11T16:50:45+5:302026-05-11T16:51:15+5:30

या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची चौकशी केल्यावर त्यांनी भारतात घुसखोरी केल्याचे उघडकीस आले. त्या स्वेच्छेने देहविक्रय करत असल्याची माहिती मिळाली आहे

Voluntary prostitution in Budhwar Peth; 5 Bangladeshi women detained, 130 Bangladeshis repatriated in the last 2 years | बुधवार पेठेत स्वेच्छेने देहविक्रय; ५ बांगलादेशी महिला ताब्यात, गेल्या २ वर्षात १३० बांगलादेशी मायदेशी

बुधवार पेठेत स्वेच्छेने देहविक्रय; ५ बांगलादेशी महिला ताब्यात, गेल्या २ वर्षात १३० बांगलादेशी मायदेशी

पुणे : बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत (रेड लाईट) पोलिसांनी पुन्हा कारवाई केली. या कारवाईत पाच बांगलादेशीमहिलांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पाच महिलांविरोधात बेकायदा वास्तव्य केल्या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ जानेवारी ते ११ मे या कालावधीत परिमंडळ १ मधून ७७ बांगलादेशींना पोलिसांना पकडल्याची माहिती पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिली.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या आठवड्यात खडक पोलिसांनी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत कारवाई करुन बांगलादेशी महिलांसह १५ जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर फरासखाना पोलिसांनी रविवारी मध्यरात्री वेश्यावस्तीत शोधमोहीम राबवून पाच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले.

या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी भारतात घुसखोरी केल्याचे उघडकीस आले. त्या स्वेच्छेने देहविक्रय करत असल्याची माहिती मिळाली आहे. महिला बांगलादेशी असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषिकेश रावले, एसीपी अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, सुनील मोरे, महेश राठोड, गजानन सोनुने, वसीम शेख, रवींद्र बत्तीशे, राणी शिंदे, पूुनम ओव्हाळ, अर्चना ढवळे, करिष्मा कडाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

१३० बांगलादेशींना पाठवले मायदेशी...

गेल्या दोन वर्षात १३० बांगलादेशींना मायदेशी (डिपोर्ट) करण्यात आले आहे. बुधवार पेठेतून ताब्यात घेण्यात आलेल्या ५२ महिलांना बांगलादेशात पाठवण्यात आले आहे.

Web Title : पुणे: वेश्यालय पर छापा, देह व्यापार में लिप्त पांच बांग्लादेशी महिलाएं हिरासत में

Web Summary : पुणे पुलिस ने बुधवार पेठ के एक वेश्यालय पर छापा मारा और देह व्यापार में लिप्त पांच बांग्लादेशी महिलाओं को हिरासत में लिया। वे अवैध रूप से रह रही थीं। पिछले दो वर्षों में, 130 बांग्लादेशियों को निर्वासित किया गया है, जिनमें बुधवार पेठ की 52 महिलाएं शामिल हैं।

Web Title : Pune: Brothel Raid, Five Bangladeshi Women Detained for Prostitution

Web Summary : Pune police raided a brothel in Budhwar Peth, detaining five Bangladeshi women involved in prostitution. They were residing illegally. In the past two years, 130 Bangladeshis have been deported, including 52 women from Budhwar Peth.