Pune Police: अवैध धंदे चालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल; २ पोलीस कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 15:04 IST2026-04-24T15:03:20+5:302026-04-24T15:04:04+5:30

सार्वजनिक ठिकाणी आर्थिक देवाण-घेवाण करणे ही बाब पोलिस दलाच्या शिस्तीला व पोलिस दलाच्या लौकिकाला बाधा निर्माण करणारी आहे

Video of illegal business owner taking money goes viral 2 police personnel suspended | Pune Police: अवैध धंदे चालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल; २ पोलीस कर्मचारी निलंबित

Pune Police: अवैध धंदे चालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल; २ पोलीस कर्मचारी निलंबित

पुणे : अवैध धंदेवाल्यांकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सहायक पोलिस फौजदारासह एका पोलिस हवालदाराला पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी निलंबित केले. सहायक पोलिस फौजदार बापुसाहेब किसनराव खुटवड आणि पोलिस हवालदार अमोल प्रकाश पवार अशी निलंबित करणार्यात आलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही सहकारनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकात कार्यरत होते.

बापुसाहेब खुटवड आणि अमोल पवार हे अभिजित मारुती गायकवाड (वय ३६, रा. साईबाबा मंदिरासमोर, पर्वती दर्शन) या अवैध धंदे चालकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ मार्च महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशा प्रकारे अवैध धंदेचालवणाऱ्याच्या प्रत्यक्ष संपर्कात राहून त्यांच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी आर्थिक देवाण-घेवाण करणे ही बाब पोलिस दलाच्या शिस्तीला व पोलिस दलाच्या लौकिकाला बाधा निर्माण करणारी आहे. अशा प्रकारच्या व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने जनमानसात पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे, त्यामुळे खुटवड आणि पवार यांना पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी निलंबित केले.

Web Title : पुणे पुलिस: रिश्वतखोरी का वीडियो वायरल होने पर दो पुलिसकर्मी निलंबित

Web Summary : पुणे में दो पुलिस अधिकारियों को एक अवैध व्यवसायी से पैसे लेने के आरोप में निलंबित कर दिया गया। मार्च में वायरल हुए वीडियो से पुलिस बल की छवि धूमिल हुई, जिसके कारण उपायुक्त मिलिंद मोहिते ने उन्हें निलंबित कर दिया।

Web Title : Pune Police: Two Cops Suspended After Bribery Video Goes Viral

Web Summary : Two Pune police officers were suspended after a video surfaced showing them allegedly accepting money from an illegal business operator. The video, which went viral in March, damaged the police force's reputation, leading to their suspension by Deputy Commissioner Milind Mohite.