शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

भ्रामक कल्पनांमुळे अशांतता

By admin | Updated: September 1, 2016 01:58 IST

जागतिकीकरणापूर्वी समाजमन शांत आणि स्वस्थ होते; त्यामुळे माणसे संगीत, साहित्य, कलेत रमत होती. नंतर पत, पैसा आणि प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांमुळे मन:शांती हरवत गेली

पुणे : जागतिकीकरणापूर्वी समाजमन शांत आणि स्वस्थ होते; त्यामुळे माणसे संगीत, साहित्य, कलेत रमत होती. नंतर पत, पैसा आणि प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांमुळे मन:शांती हरवत गेली आणि शाश्वत मूल्यांकडे नेणाऱ्या साहित्याची समाजाला ओढ वाटू लागल्यामुळेच ऐतिहासिक आणि पौराणिक साहित्यावर आधारित साहित्यकृतींचा खप वाढत असल्याचे निरीक्षण प्रसिद्ध कादंबरीकार राजेंद्र खेर यांनी नोंदविले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शिवाजी सावंत मित्र मंडळ यांच्या वतीने प्रसिद्ध कादंबरीकार राजेंद्र खेर यांना डॉ. सरोजा भाटे यांच्या हस्ते युगंधर सन्मान बुधवारी प्रदान करण्यात आला. या वेळी ‘आधुनिक युगातही ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवर आधारित साहित्यकृतीकडे वाचकांचा ओढा जास्त का आहे?’ या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, जयराम देसाई उपस्थित होते. राजेंद्र खेर म्हणाले, ‘‘जागतिकीकरणाच्या वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी माणूस पत, पैसा आणि प्रतिष्ठेच्या मागे धावत राहिला. त्यामुळे शाश्वत मूल्यांकडे नेणाऱ्या साहित्याची समाजाला गरज वाटू लागली आहे. अध्यात्म्य, तत्त्वज्ञान आणि इतिहास यांकडे समाज ओढला गेला आहे. आज प्राचीन विषय इंग्रजी साहित्यातही खपाचे ठरत आहेत. उत्क्रांतीइतकेच अपक्रांतीचे आकर्षण वाढत आहे. त्या भूमिकेतूनही या साहित्याचा वाचकवर्ग वाढतो आहे. शाश्वत मूल्यांकडे जाण्यासाठी बुद्धिनिष्ठा आणि भावही निर्माण झाला पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रा. जोशी म्हणाले, ‘‘ सावंतांचा उल्लेख ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबरीकार म्हणून केला जातो; पण त्यांची लेखणी पुराण, इतिहास आणि वर्तमान अशा तिन्ही काळांना स्पर्श करणारी होती.’’ वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक करंदीकर यांनी आभार मानले.