मद्यधुंद चालकामुळे २ कारची एकमेकांना धडक; अपघातातून उघडकीस आली दिवसाढवळ्या देशी दारूची तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 20:46 IST2026-02-07T20:45:45+5:302026-02-07T20:46:35+5:30

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात अवैध हातभट्टी दारू जप्त झाल्याने खळबळ उडाली आहे.

Two cars collided due to drunk driver; Smuggling of country liquor in broad daylight exposed in accident | मद्यधुंद चालकामुळे २ कारची एकमेकांना धडक; अपघातातून उघडकीस आली दिवसाढवळ्या देशी दारूची तस्करी

मद्यधुंद चालकामुळे २ कारची एकमेकांना धडक; अपघातातून उघडकीस आली दिवसाढवळ्या देशी दारूची तस्करी

मलठण: मलठण (ता. शिरूर) येथे अष्टविनायक महामार्गावर गुरुवारी (दि. ६) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामुळे दिवसाढवळ्या सुरू असलेल्या देशी दारूच्या तस्करीचा पर्दाफाश झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात अवैध हातभट्टी दारू जप्त झाल्याने खळबळ उडाली आहे.

मलठणच्या दिशेने येणाऱ्या कारची आणि रांजणगावच्या दिशेने जाणाऱ्या कारची जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये प्रवासी राजेंद्र दरेकर, बाळासाहेब दरेकर, विष्णू गोसावी, सुरेश सातपुते व बाळासाहेब सैद हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांना तातडीने मलठण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, रांजणगावच्या दिशेने जाणाऱ्या कारमधील मद्यधुंद चालक पळून जाण्याच्या तयारीत असताना ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता आय-२० गाडीमध्ये ३० लीटर क्षमतेचे एकूण १५ कॅन आढळून आले. या कॅनमध्ये तब्बल ४५० लीटर तयार हातभट्टी दारू भरलेली होती. पोलिसांनी सर्व मुद्देमालासह वाहन ताब्यात घेऊन पंचनामा केला. मद्यधुंद चालक अनिल चंदया चौहाण (रा. रामदरा रोड, लोणी काळभोर, ता. हवेली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने संतप्त जमावाने त्याला चोप दिल्याचीही चर्चा आहे. निवडणुकीच्या काळात दिवसाढवळ्या अशा प्रकारे दारूची तस्करी सुरू असल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशा अवैध धंद्यांवर तातडीने व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 

Web Title : शराबी चालक ने की दुर्घटना, अवैध शराब तस्करी का भंडाफोड़

Web Summary : मलठन में एक शराबी चालक की दुर्घटना से दिनदहाड़े शराब तस्करी का खुलासा हुआ। ग्रामीणों ने 450 लीटर अवैध शराब के साथ चालक को पकड़ा। चालक पुलिस हिरासत में, जांच जारी, प्रशासनिक निगरानी पर सवाल।

Web Title : Drunk Driver Causes Accident, Exposes Illegal Liquor Trafficking Operation

Web Summary : A drunk driver's accident in Malthan revealed a daytime liquor smuggling operation. Villagers caught the driver with 450 liters of illicit liquor. The driver is now in police custody, and an investigation is underway, raising questions about administrative oversight.