Video: चंदीगढमध्ये भाजपा कार्यालयावर बॉम्ब फेकतानाचा व्हिडीओ आला समोर; पोलिसांनी सुरू केला शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 20:19 IST2026-04-01T20:14:46+5:302026-04-01T20:19:40+5:30

Chandigarh BJP Office Blast: चंदीगढमधील भाजपाच्या कार्यालयाबाहेर बॉम्बस्फोट झाला. या स्फोटानंतर एक व्हिडीओ समोर आला असून, त्यात एक व्यक्ती हातबॉम्ब फेकताना दिसत आहे. 

Video of bomb being thrown at BJP office in Chandigarh surfaced; Police launch search | Video: चंदीगढमध्ये भाजपा कार्यालयावर बॉम्ब फेकतानाचा व्हिडीओ आला समोर; पोलिसांनी सुरू केला शोध

Video: चंदीगढमध्ये भाजपा कार्यालयावर बॉम्ब फेकतानाचा व्हिडीओ आला समोर; पोलिसांनी सुरू केला शोध

Chandigarh BJP Office Blast Video: भाजपाच्या चंदीगढमध्ये असलेल्या पंजाब प्रदेश कार्यालय बुधवारी सायंकाळी बॉम्बस्फोटाने हादरले. मुख्यालयाबाहेर झालेल्या या बॉम्बस्फोटानंतर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एक व्यक्ती हात बॉम्ब भाजपा कार्यालयाच्या दिशेने फेकताना दिसत आहे. 

चंदीगढमधील भाजपा प्रदेश कार्यायाच्या आवारात मोठा बॉम्बस्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, पार्किंगमधील अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या, कार आणि दुचाकींचे नुकसान झाले. इतकंच नाही, भाजपा कार्यालयाच्या भिंतीवर ७० ते ८० छऱ्यांच्या खुणा आढळून आल्या आहेत. 

सीसीटीव्ही फुटेजनंतर व्हिडीओही आला समोर 

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू केली. यात एक व्यक्ती हात बॉम्बची पिन काढून फेकताना दिसत आहे. हात बॉम्ब फेकल्यानंतर हा व्यक्ती घटनास्थळावरून पळून जाताना दिसत आहे. याच व्यक्तीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात व्यक्ती हात बॉम्ब दाखवतो आणि पिन काढून भाजप कार्यालयाच्या दिशेने फेकताना दिसत आहे. 

दोघांवर संशय, पोलिसांकडून शोध

पोलिसांनी परिसरातील इतरही काही सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहेत. त्यात स्फोट होण्यापूर्वी दोघे दुचाकीवरून फिरताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे स्फोटानंतरही दोघांच्या हालचाली संशयास्पद दिसत आहेत. पोलिसांनी या दोघांचा शोध सुरू केला आहे. 

ग्रेनेड बनवण्यासाठी वापरले जाणारी स्फोटक साहित्य हा बॉम्ब तयार करण्यासाठी वापरले गेल्याची शंका पोलिसांना आहे. या स्फोटाची माहिती कळताच घटनास्थळी एआयएनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

Web Title : चंडीगढ़: भाजपा कार्यालय पर बम फेंका, वीडियो सामने आया, पुलिस जांच में जुटी।

Web Summary : चंडीगढ़ में भाजपा कार्यालय पर बम विस्फोट हुआ, जिससे वाहनों को नुकसान पहुंचा। एक वीडियो में एक व्यक्ति बम फेंकते हुए दिख रहा है। पुलिस सीसीटीवी फुटेज में विस्फोट से पहले और बाद में दिखे दो संदिग्धों की जांच कर रही है। पुलिस को ग्रेनेड सामग्री के उपयोग का संदेह है। एनआईए भी जांच कर रही है।

Web Title : Chandigarh: Bomb hurled at BJP office, video surfaces, police investigate.

Web Summary : A bomb exploded at the Chandigarh BJP office, damaging vehicles. A video shows a person throwing the bomb. Police are investigating two suspects seen on CCTV before and after the blast, suspecting grenade materials were used. NIA is also investigating.