'आय लव्ह यू' म्हणत विनयभंग, जबरदस्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पुण्यात दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 09:55 IST2026-05-08T09:53:58+5:302026-05-08T09:55:05+5:30

दोघांनी मुलीला अंधारात नेऊन तिच्यावर तोंड दाबून जबरदस्तीने अत्याचार केला, नंतर धमकी दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे

Two arrested in Pune for molesting forcibly abusing minor girl while saying 'I love you' | 'आय लव्ह यू' म्हणत विनयभंग, जबरदस्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पुण्यात दोघांना अटक

'आय लव्ह यू' म्हणत विनयभंग, जबरदस्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पुण्यात दोघांना अटक

उरुळी कांचन: सोरतापवाडी (ता. हवेली) जि . पुणे परिसरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून उरुळी कांचनपोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
 
याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 106/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 अंतर्गत कलम 64(1), 74, 351(2), 3(5) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो) 2012 अंतर्गत कलम 4, 8 व 12 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 एप्रिल 2026 ते 5 मे 2026 या कालावधीत सोरतापवाडी गाव हद्दीतील कॅनॉलजवळील रस्ता व मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला हा प्रकार घडला. आरोपी आकाश रामहरी ओव्हाळ याने पीडित मुलीचा पाठलाग करत “आय लव्ह यू” म्हणत तिचा विनयभंग केला. त्यानंतर 5 मे रोजी आरोपीने त्याचा मित्र अभिजीत खंडागळे याच्या  मदतीने पीडितेला अंधारात नेऊन तिच्यावर तोंड दाबून जबरदस्तीने अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच पीडितेच्या मामाला धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे करीत आहेत.

Web Title : पुणे: नाबालिग लड़की से छेड़छाड़, बलात्कार; दो गिरफ्तार

Web Summary : पुणे के उरुली कांचन में एक नाबालिग लड़की से छेड़छाड़ और बलात्कार के आरोप में दो गिरफ्तार। आरोपी ने हमले से पहले 'आई लव यू' कहा। आईपीसी और पॉक्सो एक्ट की संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज। पुलिस जांच जारी है।

Web Title : Pune: Minor Girl Molested, Raped; Two Arrested for the Crime

Web Summary : Two arrested in Pune's Uruli Kanchan for molesting and raping a minor girl. Accused confessed 'I Love You' before the assault. A case has been registered under relevant sections of the IPC and POCSO Act. Police investigation is underway.