एलपीजीची कमतरता नाही; ग्राहकांना वेळेवर गॅसचे वितरण होणार, इंडियन ऑइलचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 10:26 IST2026-03-12T10:25:11+5:302026-03-12T10:26:11+5:30

प्रत्येक घराला एलपीजी सुरळीत आणि विश्वासार्हपणे मिळेल यासाठी इंडियन ऑइलचे वितरक अहोरात्र काम करत आहेत.

There is no shortage of LPG; Gas will be delivered to customers on time, assures Indian Oil | एलपीजीची कमतरता नाही; ग्राहकांना वेळेवर गॅसचे वितरण होणार, इंडियन ऑइलचे आश्वासन

एलपीजीची कमतरता नाही; ग्राहकांना वेळेवर गॅसचे वितरण होणार, इंडियन ऑइलचे आश्वासन

पुणे: युद्धाच्या परिणामामुळे शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होण्याच्या शक्यतेने नागरिक पॅनिक झाले असून, गॅस सिलिंडर संपण्याच्या भीतीने नागरिक आगाऊ साठवणूक करत आहेत. बुकिंग नसतानाही अनेक जण दुकानासमोर उभे राहत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून, नेहमीपेक्षा गॅस सिलिंडरच्या बुकिंगमध्ये चौपटीने वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा दिसून येत आहेत. अशातच इंडियन ऑइल कंपनीने ग्राहकांना वेळेवर गॅसचे वितरण होणार असल्याचे सांगितले आहे. 

नालागढ येथील इंडेन गॅस सर्व्हिसचे मालक चंद्रशेखर यांनी सांगितले की, इंडियन ऑइलच्या मजबूत पुरवठा नेटवर्कमुळे, कोणत्याही अडचणीशिवाय त्याच दिवशी सिलिंडर वितरित केले जात आहेत. एका दिवसापेक्षा कमी कालावधीचा बॅकलॉग असल्याने, एलपीजीची कमतरता नाही आणि ग्राहकांना वेळेवर वितरणाची खात्री दिली जात आहे. प्रत्येक घराला एलपीजी सुरळीत आणि विश्वासार्हपणे मिळेल यासाठी इंडियन ऑइलचे वितरक अहोरात्र काम करत आहेत.

शहरात गॅसटंचाई निर्माण झाली असल्याच्या अफवेतून गॅस वितरकांच्या दुकानासमोर रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घरात दोन गॅस असूनही, तिसरा गॅस मिळवण्यासाठी ग्राहकांची सध्या धडपड सुरू आहे. मात्र कोथरूड येथील एच. पी. गॅस वितरक विशाल सपत म्हणाले की लोक विनाकारण पॅनिक झाले आहेत. पूर्वी गॅस बुकिंग ४०० पर्यंत होत होते. मात्र आता बुकिंगचा आकडा १७०० पर्यंत गेला आहे. वास्तविक गॅसचा कोणताही तुटवडा नाही. केवळ व्यावसायिक गॅस देणे बंद करण्यात आले आहेत. 

दरम्यान देशभरात व्यावसायिक क्षेत्राचा गॅस थांबवला आहे. व घरगुती गॅसला प्राधान्य देण्यात आलं आहे. काळजी करण्याचे कारण नाही. घरगुती गॅस कमी पडणार नाही. केंद्राने तशी काळजी घेतली आहे, त्याला काही कालावधी जावा लागणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले आहे.  

Web Title : एलपीजी की कमी नहीं; समय पर गैस वितरण का आश्वासन: इंडियन ऑयल

Web Summary : पैनिक खरीद के बावजूद, इंडियन ऑयल ने समय पर घरेलू गैस वितरण का आश्वासन दिया। बुकिंग में वृद्धि डर के कारण है, कमी के कारण नहीं। घरेलू जरूरतों को प्राथमिकता देने के लिए वाणिज्यिक गैस की आपूर्ति बंद कर दी गई है, जिससे घरों के लिए कोई कमी नहीं होगी।

Web Title : No LPG Shortage; Timely Gas Delivery Assured, Says Indian Oil

Web Summary : Despite panic buying, Indian Oil assures timely home gas delivery. Increased bookings are due to fear, not scarcity. Commercial gas supply is stopped to prioritize domestic needs, ensuring no shortage for households.