...तर पुणे शहरातील शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयावर पुनर्विचार करणार : महापौर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 06:39 PM2020-12-29T18:39:14+5:302020-12-29T18:40:26+5:30

दहावी व बारावीच्या परीक्षा नजीक आल्याने महापालिकेने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे मागील आठवड्यात आदेश दिले आहे.

... then we will reconsider starting schools in Pune city: Mayor | ...तर पुणे शहरातील शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयावर पुनर्विचार करणार : महापौर

...तर पुणे शहरातील शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयावर पुनर्विचार करणार : महापौर

googlenewsNext

पुणे : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे बहुतांशी क्षेत्र खुली करण्याचा निर्णय घेण्यात आले आहेत. पुणे महापालिकेने यापुर्वीही २३ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसू लागल्याने ३ जानेवारीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. परंतू, दहावी व बारावीच्या परीक्षा नजीक आल्याने महापालिकेने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे मागील आठवड्यात आदेश दिले आहे.  

पुणे महापालिकेने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश देताना यावेळी शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र मात्र यावेळी आवश्यक करण्यात आले आहे. परंतु, आजमितीला पाल्याला शाळेत पाठविण्यासाठी  विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांची संमतीपत्रे कमी आल्यास, येत्या ४ जानेवारीपासून महापालिकेच्या नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत पुनर्विचार होऊ शकतो, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लोकमतशी बोलताना दिली.  

पुढील तीन चार दिवसात पालकांच्या मान्यतेची संख्या विचारात घेऊन व कोरोना विषाणुंच्या नव्या प्रकाराचा संसर्ग विचारात घेऊन, शाळा सुरू करण्याबाबत पुनर्विचार केला जाणार आहे. 
----------------
पुणे महापालिका माध्यमिक शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ८ हजार आहे. यापैकी आजमितीला केवळ २ हजार १०० च्या आसपास संमती पत्रे प्राप्त झाली आहेत. ही संख्या विचारात घेता अद्याप ५० टक्के पालकांनीही पाल्यांना शाळेत पाठविण्यास असमर्थता दर्शवली आहे.

Web Title: ... then we will reconsider starting schools in Pune city: Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.