शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नदीचा भाग चांगला करावा, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अजितदादांसमोर पुणेकरांनी मांडले गाऱ्हाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 10:17 IST

मला नुसतं मंत्रालयात बसून हे प्रश्न कळत नाही, एखादा राउंड मारला की गोष्टी पाहता येतात, लोक प्रतिनिधी म्हणून आम्ही एक राउंड मारला पाहिजे

पुणे: पुणे मेट्रोने शनिवार पेठ आणि जंगली महाराज रस्ता यांना जोडणारा पादचारी पूल बांधला आहे. हा पूल पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी पुण्यात आले होते. यावेळी त्या भागातील नागरिकांनी अजित दादांना नदी परिसराबाबत काही तक्रारी केल्या आहेत. हा पूल पाहून झाल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. 

अजित पवार म्हणाले, मेट्रो पूल पाहण्यासाठी मेट्रोने बोलवलं होतं. असंच दुसऱ्या पुलाचं काम सुरु आहे. अधिकारी चांगलं काम केलं असेल तर कौतुक केलं पाहिजे. येथील महिला पुरुषांनी काही गोष्टी सांगितल्या. नदीचा भाग, भटकी कुत्री आणि संभाजी बागेच्या तक्रारी केल्या आहेत. काही गोष्टींच कौतुक केलं. नदीचा भाग चांगला करावा असं त्यांनी सांगितलं. मला नुसतं मंत्रालयात बसून हे प्रश्न कळत नाही. एखादा राउंड मारला की गोष्टी पाहता येतात. लोक प्रतिनिधी म्हणून आम्ही एक राउंड मारला पाहिजे. त्यामुळे इथे येऊन सगळी पाहणी केली. इथे आल्याशिवाय प्रश्न कळत नाही. ओपन जिम आणि मुलांना खेळण्याचे स्पॉट केले पाहीजे. ते झालं तर चांगला होईल. मला बारीक बघण्याची सवय आहे. दुसऱ्या पुलाचं काम डिसेंबर पर्यंत होईल. ज्या गोष्टी आढळल्या त्या अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिल्या. किरकोळ त्रुटी सांगितल्या आहेत. 

ब्रिज उंच करावेत 

भिडे पूल फार जुना आहे. मागे पूल पडला होता. त्यावेळी ज्यांच्या परिसरात भिडे पुलासारखे पूल आहेत. त्याच ऑडिट कराव असा सांगण्यात आले होते. ब्रिज उंच केलेत कितीही पाणी आला तर काही त्रास होणार नाही. मागच्या ट्रिप ला खडकवासला पुलाची पाहणी केली त्याबाबत चर्चा केली. त्याचा प्लान काढायला सांगितला आहे. नागरिकांच्या कामाला सरकारी जागा लागली तर अडचण येते पण मार्ग मिळतो. 

विरोधकांनी काल निवडणूक आयोगाला मतदार यादीबाबत निवेदन दिले. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले,  काल माझी चर्चा झाली. त्याच उत्तर दिल आहे. कोणी कोणाला भेटावं हे त्यांनी बघावं. लोकशाहीत सगळ्यांना सगळ अधिकार आहेत. पारदर्शक निवडणूक होण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक होईल. स्वायत्तता आपण निवडणूक आयोगाला दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रmula muthaमुळा मुठाdogकुत्रा