शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील पालखी मुक्कामाचा पेच अखेर सुटला; भवानी पेठेतच होणार माऊलींचा मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 19:42 IST

वारकऱ्यांची वाढती संख्या आणि जागेची टंचाई यामुळे मुक्काम हलवण्याची चर्चा सुरू होती, परंतु प्रशासनाने दिलेल्या लेखी हमीनंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पुणे येथील मुक्कामाबाबत गेल्या काही दिवसांपासून असलेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. वारकऱ्यांची वाढती संख्या आणि जागेची टंचाई यामुळे मुक्काम हलवण्याची चर्चा सुरू होती, परंतु प्रशासनाने दिलेल्या लेखी हमीनंतर यावर्षीही पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरातच होणार असल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीने जाहीर केले आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांना २५ मे २०२६ रोजी दिलेल्या लेखी पत्रात मुक्कामाच्या ठिकाणी विविध उपाययोजना करण्याची ग्वाही दिली आहे. यामध्ये मंदिर परिसरातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी शेजारील ३ खाजगी मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच मंदिरासमोरील फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमणे हटवून तो भाग मोकळा करण्यात येत असून भाविकांच्या सुलभ प्रवासासाठी रस्ता निर्मिती आणि अडथळा ठरणारे विद्युत खांब सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहेत. पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर कारवाई सुरू असून पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे.

सन २०१० पासून पुण्यातील मुक्काम रेसकोर्स मैदानावर हलवण्याची मागणी होत होती. भवानी पेठेतील अपुरी जागा, दर्शन रांगेत भाविकांना होणारा ऊन-पावसाचा त्रास आणि पार्किंगच्या सुविधांचा अभाव यामुळे संस्थान कमिटीने १३ एप्रिल २०२६ रोजीची बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. हा पेच सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार हेमंत रासने यांनी विशेष प्रयत्न केले. पुणे महानगरपालिकेने या कामासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली असून ३१ मे २०२६ पर्यंत आवश्यक जागा ताब्यात घेण्याचे आश्वासन दिले आहे.

यावर्षीचा पालखी सोहळा ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आळंदीतून प्रस्थान ठेवेल आणि ९ व १० जुलै असे दोन दिवस पालखीचा मुक्काम पुण्यातील भवानी पेठेत राहील. प्रशासनाने दिलेल्या लेखी हमीपत्रावर बुधवारी (दि. १३) देवस्थानची बैठक पार पडली. याप्रसंगी पालखी सोहळा प्रमुख ऍड. राजेंद्र उमाप, प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, ऍड. रोहिणी पवार, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊ महाराज गोसावी, व्यवस्थापक माऊली वीर आदी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Palkhi halt impasse resolved; Mauli's stay at Bhavani Peth.

Web Summary : The annual Palkhi procession's Pune halt is confirmed at Bhavani Peth. Authorities pledged improvements, including space acquisition and infrastructure upgrades, resolving prior concerns about overcrowding and facilities. The procession commences July 8th, with a two-day Pune stay.
टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीcollectorजिल्हाधिकारीMaharashtraमहाराष्ट्रashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Pandharpurपंढरपूर