पुणे : खडी क्रशर प्लांटसाठी जागा दाखवण्याची बतावणी करून मेट्रो ठेकेदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी खराडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी खडी क्रशर (स्टोन क्रशर) चालक आहेत. सागर दत्तात्रय झुरुंगे (वय ३९), विजय सुरेश वाळुंज (वय ३८), राजू विजयकुमार सहाणे (वय ३२), रुपेश शिवाजी गावडे (वय ३८, सर्व रा. लोणीकंद, पुणे - अहिल्यानगर रस्ता) आणि प्रकाश बाळासाहेब राऊत (वय ३४, रा. तुळापूर, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत मेट्रोतील ठेकेदाराने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार ४० वर्षीय ठेकेदार मूळ उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवासी आहेत. सध्या ते गहुंजे भागात राहायला आहेत. ते रेल विकास निगम लिमिटेडच्या वतीने मेट्रो प्रकल्पात बांधकामाचे काम करतात. तक्रारदारांनी बांधकामासाठी आरोपी झुरुंगे यांच्याकडून वेळोवेळी खडी क्रशरचा माल घेतला आहे. खडी क्रशर व्यवसायासाठी जागा दाखवतो, असे सांगून आरोपींनी त्यांना मंगळवारी (दि. १४) खराडी आयटी पार्क परिसरात बोलावले. तेथील एका हॉटेलजवळ ते दुपारी बाराच्या सुमारास थांबले होते. आरोपींनी त्यांना जागा दाखविण्याचा बहाणा करून कारने एका ठिकाणी नेले. तेथे दुसऱ्या कारमधून काही आरोपी आले. आरोपींनी तक्रारदारांकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागणी करून त्यांना मारहाण केली. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास तक्रारदाराला खराडी परिसरात सोडून आरोपी पसार झाले. यानंतर तक्रारदारांच्या चालकाने झालेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे आणि परिमंडळ सातचे उपायुक्त सोमय मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी पेरणे भागात नाकाबंदी लावून आरोपींना ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गोडसे पुढील तपास करत आहेत.
Web Summary : A Pune metro contractor was kidnapped near Kharadi for a ₹50 lakh ransom. Lured by a false promise of land, he was abducted and threatened. Police arrested five individuals, all stone crusher operators, following the incident. Investigations are ongoing.
Web Summary : पुणे में मेट्रो ठेकेदार का 50 लाख की फिरौती के लिए अपहरण किया गया। जमीन दिखाने के बहाने खराडी के पास से अगवा कर धमकी दी गई। पुलिस ने पांच आरोपियों को गिरफ्तार किया, सभी स्टोन क्रशर ऑपरेटर हैं। जांच जारी है।