शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

पुणेकरांवरील पाणी कपातीची टांगती तलवार गणेश महोत्सवापर्यंत दूर! महापौरांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 7:55 PM

खडकवासला धरण प्रकल्प पाणलोट क्षेत्रात कालपासून जोरदार पाऊस

ठळक मुद्देशहरासह जिल्ह्यात १५ ऑगस्टनंतर मोठ्या पावसाची शक्यता

पुणे : खडकवासला धरण प्रकल्पातील पाणलोटक्षेत्रात कालपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातीलपाणीसाठ्यात एक टीएमसीने वाढ झाली. प्रकल्पातील एकूण पाणीसाठा आता१०.६६ अब्ज घनफूट ( टीएमसी) झाला आहे.त्यामुळे गणेश महोत्सवापूर्वी शहरात कोणत्याही प्रकारची पाणी कपात करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. या स्पष्टीकरणानंतर पुणे शहरावरील पाणीकपातीची टांगती तलवार तूर्तास तरी दूर झाली आहे. 

पुणे कपात न करण्याचा निर्णयावर महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे शहरासह जिल्ह्यात गेले काही दिवस मोठ्या स्वरूपाच्या पावसाने उघडीप घेतली होती.त्यामुळे पाटबंधारे खात्याकडून शिल्लक पाणीसाठ्याबाबत नियोजन करून पाणी कपात करण्याचे धोरण होते. मात्र,कालपासून शहर व धरण पाणलोट क्षेत्रात चांगल्या प्रकारे पाऊस झाला आहे. तसेच वेध शाळेने १५ ऑगस्टनंतर शहर व जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे गणेश महोत्सव होईपर्यंत तरी कुठल्याही प्रकारची पाणी कपात करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

गेल्यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा पूर्ण क्षमतेने होता. त्यामुळे पाणी कपात करण्याची गरज नव्हती. जूनपासून पावसाळा सुरू झाल्यापासून जोरदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पाणी साठ्यात समाधानकारक वाढ होऊ शकली नाही. पाऊस नाही आणि संपत चाललेला पाणीसाठ्यामुळे नियोजन करून पाणी कपात करणार असल्याचे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते.  आता खडकवासला प्रकल्पाचे पाणी शेतीलाही देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्याचा फायदा दौंड, इंदापूर मधील शेतीला होईल........... सोमवार सकाळपासून (सकाळी ६) मंगळवार संध्याकाळपर्यंत (सायंकाळी ६) ३६ तसांत खडकवासला धरण प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस आणि धरणांतील पाणीसाठा: खडकवासला: ४४ मिमी, ३७.१५ टक्के. पानशेत: १०१मिमी, ४२.९७ टक्के. वरसगाव: १०५ मिमी, ३५.४७ टक्के. टेमघर: १३० मिमी, २२.०५टक्के. प्रकल्पातील एकूण पाणीसाठा ३६.५८टक्के. ....खडकवासला धरण प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे पुणेकरांवरील पाणी कपातीची तूर्तास गरज नाही. प्रत्येक सप्ताहात पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात येणार आहे. जोरदार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन तो ८० ते ९० टक्के झाल्यावर शेतीसाठी पाणी सोडण्यात येईल. विजय पाटीलकार्यकारी अभियंता, खडकवासला धरण प्रकल्प

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरWaterपाणीDamधरणRainपाऊस