Baramati bypoll election 2026: देशात विक्रमी लीडने सुनेत्रा काकी निवडून येतील; रोहित पवार यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 12:35 IST2026-05-04T12:34:25+5:302026-05-04T12:35:39+5:30
Baramati bypoll election 2026 ९७ टक्के मतदान सुनेत्रा काकींना होईल आणि चुकून ३ टक्के इकडेतिकडे जातील असा विश्वास रोहित यांनी यावेळी व्यक्त केला आहे

Baramati bypoll election 2026: देशात विक्रमी लीडने सुनेत्रा काकी निवडून येतील; रोहित पवार यांचा दावा
पुणे: बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ९७ टक्के मतदान होईल. देशात सगळ्या जास्त लीडने सुनेत्रा पवार या निवडून येतील असा दावा आमदार रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. हा निकाल बारामतीकरांच्या अपेक्षेप्रमाणे लागणार आहे. लोकांनी दादांचे कार्य, प्रेम पाहून सुनेत्रा काकींना मतदान केले आहे. विरोधात जाणारे मतदान चुकून गेले असेल. ९७ टक्के मतदान सुनेत्रा काकींना होईल आणि चुकून ३ टक्के इकडेतिकडे जातील असा विश्वास रोहित यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर २२ उमेदवार आहेत. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षाचा एकही उमेदवार नाही. नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे आर. वाय घुटूकडे हे आहेत. ते मूळचे सोलापूरमधील आहे. हिंदुस्थान जनता पार्टीचे सतीश कदम हे उमेदवार आहेत. ते जत येथील आहेत. उर्वरित २० जण हे अपक्ष आहेत. त्यामध्ये बारामतीतील आठजण आहेत. अन्य अपक्ष हे बारामतीबाहेरील आहेत. त्यात धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आणि ‘बिग बॉस मराठी’मधील अभिजित बिचुकले यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात असलेले २२ उमेदवार किती मते घेणार, यावर जादुई आकडा गाठला जाणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.
१५ व्या फेरी अखेर ११ हजार २२४ मतदान झाले आहे. त्यापैकी सुनेत्रा पवार यांना ११ हजार ६१ मते मिळाली आहेत. १५ व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार या १ लाख ३२ हजार ९१६ मतांनी आघाडीवर आहेत. विक्रम मोडण्यासाठी १ लाख ६५ हजार २६६ हा जादुई आकडा असणार आहे. अजून ९ फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार हा जादुई आकडा पार करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.