Video: अचानक मालगाडी सुरू; रूळ ओलांडताना महिला घाबरून मध्यभागी झोपली, पाटस रेल्वे स्थानकातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 15:15 IST2026-05-09T15:14:55+5:302026-05-09T15:15:17+5:30

रेल्वे प्रशासनाने पाटस रेल्वे स्थानकात पादचारी मार्ग आणि फूट ओव्हरब्रिज तयार केला नसल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव जीव मुठीत घेऊन लोहमार्ग ओलांडावा लागत आहे

Suddenly a goods train started; Woman fell asleep in the middle of the track in fear while crossing the tracks, incident at Patas railway station | Video: अचानक मालगाडी सुरू; रूळ ओलांडताना महिला घाबरून मध्यभागी झोपली, पाटस रेल्वे स्थानकातील घटना

Video: अचानक मालगाडी सुरू; रूळ ओलांडताना महिला घाबरून मध्यभागी झोपली, पाटस रेल्वे स्थानकातील घटना

पाटस : पाटस रेल्वे स्थानकात एका महिलेने लोहमार्गामध्ये झोपून आपला जीव वाचवण्याची घटना शनिवार (दि ९) रोजी सकाळी घडली. सुदैवाने या घटनेत संबंधित महिलेला कुठलीही इजा झाली नाही. महिला प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर जात असताना रेल्वे स्थानकात उभी असलेली रेल्वे मालगाडी अचानक सुरू झाली. परिस्थितीचे भान पाहता संबंधित महिला दोन्ही रेल्वे रुळाच्या मध्यभागी झोपली. दरम्यान संपूर्ण मालगाडी जाईपर्यंत ही महिला जीव मुठीत धरून लोहमार्गात झोपली होती. ज्यावेळेस मालगाडी निघून गेली तेव्हा या महिलेच्या जीवात जीव आला. 


 
वास्तविक पाहता रेल्वे प्रशासनाने पाटस रेल्वे स्थानकात पादचारी मार्ग आणि फूट ओव्हरब्रिज तयार केला नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना नाईलाजास्तव जीव मुठीत धरून लोहमार्ग ओलांडावा लागत आहे. पाटस रेल्वे स्थानकात फुट ओव्हरब्रिज आणि पादचारी मार्ग होण्यासाठी कानगावचे माजी सरपंच राहुल चाबुकस्वार यांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तसेच या कामी ग्रामस्थ सामाजिक सेवा संस्था यांनी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन पाटस रेल्वे स्थानकात ये - जा करावी लागत आहे. तेव्हा रेल्वे प्रवाशांच्या या गंभीर समस्येकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी पुढे आली आहे.

Web Title : पाटस में अचानक ट्रेन शुरू होने से महिला पटरी के बीच लेटी

Web Summary : पाटस स्टेशन पर, एक खड़ी मालगाड़ी के अचानक शुरू होने से एक महिला पटरी के बीच लेटकर बाल-बाल बच गई। फुट ओवरब्रिज की कमी के कारण जोखिम भरे क्रॉसिंग हो रहे हैं, जिससे यात्रियों की सुरक्षा सुनिश्चित करने के लिए तत्काल रेलवे कार्रवाई की मांग की जा रही है।

Web Title : Woman Lies Between Tracks as Train Starts Suddenly in Patas

Web Summary : At Patas station, a woman narrowly escaped injury by lying between the tracks when a stationary freight train suddenly started. Lack of a foot overbridge forces risky crossings, prompting calls for immediate railway action to ensure passenger safety.