महाराष्ट्राच्या रक्षणासाठी ड्युटी फर्स्ट म्हणणाऱ्या रणरागिनींना गृहमंत्र्यांचा सलाम, लिहिलं खास पत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 08:48 PM2021-03-07T20:48:45+5:302021-03-07T20:50:07+5:30

रणरागिणी होऊन महाराष्ट्राच्या रक्षणासाठी दिवसरात्र तैनात राहून ड्युटी फर्स्टचा आदर्श पाळणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सलाम केला आहे.

state home minister anil deshmukh writes a letter to all women police staff on the occasion of women's day | महाराष्ट्राच्या रक्षणासाठी ड्युटी फर्स्ट म्हणणाऱ्या रणरागिनींना गृहमंत्र्यांचा सलाम, लिहिलं खास पत्र!

महाराष्ट्राच्या रक्षणासाठी ड्युटी फर्स्ट म्हणणाऱ्या रणरागिनींना गृहमंत्र्यांचा सलाम, लिहिलं खास पत्र!

googlenewsNext

पुणे : रणरागिणी होऊन महाराष्ट्राच्या रक्षणासाठी दिवसरात्र तैनात राहून ड्युटी फर्स्टचा आदर्श पाळणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सलाम केला आहे.

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देशमुख यांनी राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना पत्र पाठविले आहे. यामध्ये देशमुख यांनी म्हटले आहे की, ऊन, वारा, पाऊस, दिवस, रात्र...एवढंच कशाला कोरोनाच्या विषाणूपुढंही तुम्ही नमत नाही. रणचंडिका, दुर्गा वैभवसंपन्नलक्ष्मी,विद्यावती सरस्वती या रुपात आणि लेकाची माय,  बापाची लेक,भावाची बहिण,संसारातली अर्धांगिनी या नात्यात महिला कार्य करतात. प्रेम, वात्सल्य, आपुलकी, स्नेह, लळा, जिव्हाळा, मायेचा सागर, सेवा, क्षमा, कर्तव्य, कारुण्य, त्यागाची मूर्ती आहेत. त्यामुळेच पृथ्वी शेषाच्या फण्याने नव्हे तर तुम्ही साऱ्याजणींनी पेलली आहे. 'वर्दी'तल्या माता-भगिनींबद्दल तर आणखी आदर वाटतो असे कौतुक करताना देशमुख म्हणतात, तुमच्यातली आई,  पत्नी,  बहिण, मुलगी ही सारी नाती घरी ठेवून तुम्ही 'ड्युटी फर्स्ट' म्हणत वर्दी चढवता. रणरागिणी होऊन महाराष्ट्राच्या रक्षणासाठी दिवसरात्र तैनात होता.

ऊन, वारा, पाऊस, दिवस, रात्र...एवढंच कशाला कोरोनाच्या विषाणूपुढंही तुम्ही नमत नाही. म्हणूनच वर्षातून एकदाच हा दिवस साजरा का करावा? महिला दिन रोज साजरा करायला हवा.

Web Title: state home minister anil deshmukh writes a letter to all women police staff on the occasion of women's day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.