धक्कादायक! अठ्ठावीस वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने वार करून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 14:37 IST2021-04-11T14:36:42+5:302021-04-11T14:37:45+5:30

डोक्यात व हातावर धारधार हत्याराने वार करून त्याचा केला खून

Shocking! Twenty-eight-year-old man stabbed to death | धक्कादायक! अठ्ठावीस वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने वार करून हत्या

धक्कादायक! अठ्ठावीस वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने वार करून हत्या

ठळक मुद्देखुनीचा तपास अजून लागलेला नाही

कामशेत : नाणे मावळातील करंजगाव येथील एका २८ वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पप्पु सुरेश तंबोरे (वय ३२, रा. करंजगाव ) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किशोर सुरेश तंबोरे (वय २८ वर्ष, रा. करंजगाव ता. मावळ) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  नाणे मावळातील मोरमारवाडी ते करंजगाव रस्त्याच्या साईड पट्टीवर रविवारी पहाटेच्या सुमारास  कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काही कारणावरून किशोर सुरेश तंबोरे याच्या तोंडावर, डोक्यात व हातावर धारधार हत्याराने वार करून त्याचा खून केला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी लंबोते यांनी घटनास्थळी भेट दिली. आता याप्रकरणाचा पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.

Web Title: Shocking! Twenty-eight-year-old man stabbed to death