पुण्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील धक्कादायक माहिती; मुलीवर अत्याचार करताना नराधमांनी केलं होतं व्हिडिओ चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 09:46 PM2021-09-16T21:46:44+5:302021-09-16T21:46:51+5:30

तब्बल ९ ठिकाणी नेऊन आरोपींनी मुलीवर अत्याचार केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे

Shocking information on gang rape case in Pune; The video was shot by the culprits while torturing the girl | पुण्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील धक्कादायक माहिती; मुलीवर अत्याचार करताना नराधमांनी केलं होतं व्हिडिओ चित्रीकरण

पुण्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील धक्कादायक माहिती; मुलीवर अत्याचार करताना नराधमांनी केलं होतं व्हिडिओ चित्रीकरण

googlenewsNext
ठळक मुद्देचौदा आरोपींना २० सप्टेंबरर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली

पुणे : अल्पवयीन पीडित मुलीवर केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ चित्रीकरण केले असल्याचे आरोपी आणि पीडित मुलीने सांगितले असून, तब्बल ९ ठिकाणी नेऊन आरोपींनी मुलीवर अत्याचार केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींंना या गुन्ह्यात अजून कुणी मदत केली आहे का? अल्पवयीन मुलींना समज नसल्याचा फायदा घेऊन आणखी कोणत्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले आहेत का? याचा तपास करण्यासाठी १४ आरोपींना एस.पी पोंक्षे कोर्टाने आणखी चार दिवसांची, तर अजून दोन आरोपींना २६ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मशाक अब्दुलमजीद कान्याल (वय 27 रिक्षाचालक, वैदूवाडी, हडपसर), अकबर उमर शेख (वय 32), रफिक मुतर्जा शेख (वय 32), अझरूददीन इस्लमामुददीन अन्सारी (वय 27), प्रशांत सॅमिअल गायकवाड (वय 32), राजकुमार रामनगीना प्रसाद (वय 29 वर्षे), नोईब नईम खान (वय 24), असिफ फिरोज पठाण (वय 36), मिराअली उर्फ मिरा अजीज शेख (वय 26), शाहजुर उर्फ सिराज साहेबलाल छप्परबंद (वय 28), समीर मेहबूब शेख (वय 19), फिरोज उर्फ शाहरू ख साहेबलाल शेख (वय 22), महबूब उर्फ गौस सत्तार शेख (वय 23) आणि मोहम्मद उर्फ गोलू मोज्जाम आलम (वय 19) अशी पोलीस कोठडी दिलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपली. त्यांच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तर मेहबूब बादशाह शेख (वय 27) आणि इस्माईल लतीफ शेख ( वय 36) या दोघांना बुधवारी (15) अटक करण्यात आली त्यांना न्यायालयात आणले असता त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तेरा आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडित मुलीवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दाखल गुन्हयामध्ये भा.दवि कलम 376 (ड) (अ), 377, 34 व लैगिंक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4(2), 5 (ग), 6,8,12 प्रमाणे कलमवाढ करण्यात आली आहे. आरोपींकडून गुन्हयाचा अधिक तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. त्यानुसार १४ आरोपींना २० सप्टेंबरर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: Shocking information on gang rape case in Pune; The video was shot by the culprits while torturing the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.