पुणे: पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकर क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. रात्रभर सीबीआय कार्यालयात मोटेगावकरांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मोटेगावकर क्लालेसच्या विद्यार्थ्यांचीही आता सीबीआयकडून चौकशी सुरु करण्यात येत आहे. गेल्या काही तासांपासून काही पालक त्यांच्या पाल्यांसोबत सीबीआय कार्यालयात आले आहेत. विद्येच्या माहेरघरातच या प्रकरणात प्रसिद्ध क्लासच्या प्राध्यापकांची चौकशी होत असल्याने अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. मोटेगावकर क्लासेस मधून असंख्य विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. अनेक विद्यार्थी या क्लासमुळे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र आता या पेपर फुटी प्रकरणात खुद्द संचालकांनाच ताब्यात घेतल्याने शिक्षण वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने पुण्यातून अटक केली हाेती. कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा अध्यापक असून, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होता. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ब्यूटी पार्लर चालविणारी मनीषा वाघमारे हिलादेखील यापूर्वी अटक केली होती. ‘सीबीआय’ने जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, अहिल्यानगर परिसरातून आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली आहे. त्यातील पाच आरोपींना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Web Summary : Pune coaching class director Shivraj Motegaonkar was arrested by the CBI in connection with the NEET paper leak. Students are being questioned. Previously, a chemistry professor and beauty parlor owner were arrested. CBI has arrested nine accused from multiple cities.
Web Summary : NEET पेपर लीक मामले में पुणे के कोचिंग क्लास के निदेशक शिवराज मोटेगांवकर को सीबीआई ने गिरफ्तार किया। छात्रों से पूछताछ जारी है। इससे पहले, रसायन विज्ञान के प्रोफेसर और ब्यूटी पार्लर के मालिक को गिरफ्तार किया गया था। सीबीआई ने कई शहरों से नौ आरोपियों को गिरफ्तार किया है।