शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुण्यातील भीमाशंकर मंदिरात शिवलिंग पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 18:19 IST

भीमाशंकर परिसरात गेल्या अनेक तासांपासून दमदार पावसाने हाहाकार माजवला आहे

ठळक मुद्देपुण्यातील, जुन्नर, खेड, आंबेगाव, मुळशी या तालुक्यात जोरदार पाऊस

पुणे : पुण्यातील, जुन्नर, खेड, आंबेगाव, मुळशी या तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. अनेक भागात नद्यांना पुर आला आहे. त्यातच भीमाशंकर परिसरात गेल्या अनेक तासांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. काल आणि आज भीमाशंकर परिसरात जोरदार पाऊस पडल्याने मंदिराच्या बाजुच्या डोंगरातुन पुराचा लोट मंदिरात आला आहे. त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरले असून शिवलिंग पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे.  महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर मुख्य मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे.

बाराज्योर्तिर्लींगापैकी एक असणार्‍या श्री क्षेञ भीमाशंकरकडे जाणारा हा प्रमुख रस्ता असून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण, आहुपे, खोर्‍याप्रमाणेच डिंभे परिसरामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली होती. रस्त्यामध्ये मातीच्या ढीगार्‍यासह,  दगड आल्यामुळे  हा रस्ता वाहतुकीसाठी बंद पडला होता. भीमाशंकर कडे जाणार्‍या लोकांनी दुपारपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.  पण मुसळधार पावसाने आता मंदिरातच पाणी साचल्याने दिसून आले आहे.  

मंदिरात भाविकांना नो एन्ट्री

मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरु असल्याने पुराच्या पाण्याचा प्रवाह अचानक वळुन तेच पाणी मंदिरात आल्याचं पाहायला मिळतंय. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांना एन्ट्री नाहीय. मंदिरात केवळ पुजारी असतात. मंदिरात दैनंदिन पुजा-अर्चा सुरु असते. मात्र आता पाण्याच्या वेढा वाढल्याने प्रशासनाने पुजारी आणि मंदिरातील कर्मचाऱ्यांनाही योग्य ते सूचना दिलेल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेBhimashankarभीमाशंकरWaterपाणीRainपाऊस