शशांक हगवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरण; ४ तोतया अधिकाऱ्यांना जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 11:44 IST2025-06-21T11:44:12+5:302025-06-21T11:44:22+5:30

शशांक आणि लता हगवणे यांनी पाठवलेल्या तोतया बँक वसुली एजंटांसह मांडवली करणाऱ्याचा जमीन मंजूर

Shashank Hagavane JCB fraud case; 4 impersonator officers granted bail | शशांक हगवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरण; ४ तोतया अधिकाऱ्यांना जामीन मंजूर

शशांक हगवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरण; ४ तोतया अधिकाऱ्यांना जामीन मंजूर

चाकण : जेसीबी गैरव्यवहार प्रकरणात महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या चार जणांना गुरुवार (दि.१९) ला  राजगुरूनगर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 

जेसीबी फसवणूक प्रकरणात प्रशांत येळवंडे यांनी महाळुंगे एमआयडीसी (ता.खेड) पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती.त्यांच्या फिर्यादीवरून शशांक आणि लता हगवणे या माय लेकासह योगेश राजेंद्र रासकर (वय.२५ वर्षे,रा.तळेगाव ढमढेरे ता.शिरूर),गणेश रमेश पोतले (वय.३० वर्षे रा.शेलपिंपळगाव ता.खेड),वैभव मोहन पिंगळे (वय.२७ वर्षे,तळेगाव ढमढेरे) या तोतया बँक वसुली एजंटांसह मांडवली करणारा प्रणय तुकाराम साठे (वय.२५ वर्षे रा.शिवशाईनगर,कोथरूड,पुणे) यांच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
शशांक आणि लता हगवणे यांच्या जेसीबी गैरव्यवहार प्रकरणातील कथित इन्डसइंड बँकेचे तोतया अधिकारी आरोपी गणेश पोतले, योगेश रासकर, वैभव पिंगळे आणि प्रणय साठे यांना  खेड न्यायालयाने जामिनावर मुक्त केले. आरोपींच्या जामीन अर्जाच्या युक्तिवादावेळी आरोपीचे वकिल ॲड.राहुल गुरव,भूषण तांबे, प्रवीण पडवळ आणि प्रशांत राक्षे यांनी आरोपींना या गुन्ह्यामध्ये चुकीच्या पद्धतीने गोवले गेले असून त्यांची जेल कस्टडी ही खटला चालविण्यापूर्वीची शिक्षा ठरेल. तसेच सदर आरोपींनी कोणताही गुन्हा केलेला नसून केवळ बँकेच्या आदेशाचे पालन केले आहे,असा युक्तिवाद केला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Shashank Hagavane JCB fraud case; 4 impersonator officers granted bail