शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून शरद पवारांनी मेट्रोतून प्रवास केला; टिकेनंतर महामेट्रोचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 17:45 IST

पवारांनी स्टेशन परिसराची पाहणी करून त्यांनी फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका असा प्रवासही मेट्रोने केला

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी आज पुणेमेट्रोच्या फुगेवाडी स्टेशनला भेट दिली. स्टेशन परिसराची पाहणी करून त्यांनी फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका असा प्रवासही मेट्रोने केला. त्यांच्या याच मेट्रो प्रवासावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी आक्षेप घेत शरद पवारांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोची चाचणी म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असल्याचे सांगत टीका केली होती. तसेच मेट्रो प्रशासनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले होते. 

त्यानंतर आता पुणे महामेट्रोकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले. मेट्रो प्रकल्पाची माहिती हवी म्हणून शरद पवारांकडून आम्हाला विचारणा करण्यात आली होती. पुणे मेट्रोचे काम सुरू होऊन साडेचार वर्षे झाली, परंतु ते आतापर्यंत कधीही आले नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांना फुगेवाडी येथील मेट्रो स्टेशनच्या कार्यालयात बोलावले. त्यानुसार ते आज या ठिकाणी आले होते.

हा प्रकल्प कधी सुरू झाला, खर्च किती, सध्याची स्थिती काय आहे ही सर्व माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर फुगेवाडी स्टेशनची त्यांना माहिती दिली आणि नंतर त्यांनी मेट्रोने प्रवास केला. आजच्या भेटीत मेट्रोची ट्रायल रण झाली नाही, शरद पवारांना फक्त मेट्रो संदर्भातली माहिती देण्यात आली. या मार्गावरील मेट्रोची ट्रायल 2019 मध्येच झाल्याचे महामेट्रोचे सरव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी सांगितले. 

चंद्रकांत पाटील यांनी मेट्रोतून प्रवास केल्यानंतर शरद पवार यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मेट्रोची चाचणी घेऊन जणू काही त्यांच्यामुळे पुणे मेट्रोचा प्रकल्प झाल्याचे प्रशासनाने भासविणे म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असा प्रकार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील लोकप्रतिनिधींना डावलून केवळ राज्यसभा सदस्य असलेल्या एका नेत्याच्या उपस्थितीत चाचणी घेतल्याबद्दल मेट्रोच्या प्रशासनाविरोधात आपण विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रोMaharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवारchandrakant patilचंद्रकांत पाटील