दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; निकालही लवकर लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 20:13 IST2026-05-12T20:13:03+5:302026-05-12T20:13:35+5:30

दहावीची पुरवणी परीक्षा दि. १६ ते ३० जून दरम्यान, तर बारावीची परीक्षा दि. १६ जून ते ८ जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे

Schedule for 10th-12th supplementary exams also announced; Results will also be out soon | दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; निकालही लवकर लागणार

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; निकालही लवकर लागणार

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने यंदा दहावी-बारावीच्या नियमित परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर घेतल्या. निकानही लवकर लावला. आता पुरवणी परीक्षा देखील लवकर घेतली जात आहे. याबाबतचे वेळापत्रकही जाहीर झाले असून, इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा दि. १६ ते ३० जून दरम्यान, तर बारावीची परीक्षा दि. १६ जून ते ८ जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याचा निकाल देखील १५ जुलै पर्यंत लावले जातील, अशी माहिती राज्य मंडळाच्या वतीने देण्यात आली.

दरम्यान, नुकताच जाहीर झालेला दहावीचा निकाल काही विद्यार्थ्यांना पाहता आला नाही, याबाबत विचारणा केली असता काही तांत्रिक कारणे आली होती, त्यात सुधारणा केली आहे. त्यामुळे सर्वांचे निकाल दिसत आहेत. त्यातही काही अडचणी असल्यास दूर केली जाईल, अशी ग्वाही देखील राज्य मंडळाचे अध्यक्ष डाॅ. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिले आहे.

Web Title : दसवीं, बारहवीं पूरक परीक्षा का शेड्यूल जारी; जल्द ही परिणाम घोषित होंगे।

Web Summary : महाराष्ट्र बोर्ड ने दसवीं और बारहवीं की पूरक परीक्षा की तिथियाँ घोषित कीं: क्रमशः 16-30 जून और 16 जून-8 जुलाई। परिणाम 15 जुलाई तक आने की उम्मीद है। प्रारंभिक परिणाम प्रदर्शन के साथ तकनीकी मुद्दों को हल कर लिया गया है, डॉ. त्रिगुण कुलकर्णी ने आश्वासन दिया।

Web Title : SSC, HSC Supplementary Exam Schedule Released; Results to be out soon.

Web Summary : Maharashtra board announced SSC and HSC supplementary exam dates: June 16-30 and June 16-July 8, respectively. Results are expected by July 15. Technical issues with the initial result display have been resolved, assured Dr. Trigun Kulkarni.