शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

सावरकर यांच्यावरील हत्येचा ठपका पुसला जावा

By admin | Updated: September 7, 2015 04:32 IST

महात्मा गांधी यांच्या हत्येच्या आरोपातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र त्यानंतर कपूर कमिशनच्या अहवालावरून सावरकरांवर ठपका ठेवण्यात आला

पार्ट ब्लेअर : महात्मा गांधी यांच्या हत्येच्या आरोपातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र त्यानंतर कपूर कमिशनच्या अहवालावरून सावरकरांवर ठपका ठेवण्यात आला. सावरकरांची बदनामी थांबवायची असेल तर सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अहवालातील परिच्छेद काढून टाकावा, अशी मागणी चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे यांनी केली.चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचा रविवारी समारोप झाला. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सावरकरांच्या मृत्यूनंतर कपूर कमिशनने दिलेल्या अहवालात सावरकर यांच्यावर ठपका ठेवला. त्या अहवालानुसार सावरकर यांच्याविरोधात सातत्याने लेखन केले जात आहे. न्यायालयाने सावरकर यांना निर्दोष ठरविले आहे. तरीही त्यांना कुणी दोष देत असेल तर थेट सावरकरप्रेमींनी पोलिसांत तक्रार दिली पाहिजे. कारण कपूर कमिशनच्या दोन खंडाच्या अहवालात असे कुठेही म्हटलेले नाही, की सावरकरांमुळे गांधीजी यांची हत्या झाली. केंद्रात तसेच राज्यात किमान सावरकरद्वेषी सरकार नाही, त्यामुळे या सरकारांनी पुढाकार घेऊन अहवालातील परिच्छेद काढून टाकावा.’’संमेलनाच्या अखेरच्या दिवशी सावरकर यांच्यावर आधारित कार्यक्रम झाले. ‘समाजसुधारणा आणि विज्ञाननिष्ठा’ हा परिसंवाद रंगला. विज्ञाननिष्ठ सावरकर म्हणजे काय, या वेळी सांगण्यात आले. ‘मी सावरकर बोलतोय’ हा विशेष एकपात्री कार्यक्रम झाला. अभिनेते योगेश सोमण यांनी याचे सादरीकरण केले. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संस्थेने आयोजित केलेला ‘शतजन्म शोधताना’ या कार्यक्रमाद्वारे महाकवी सावरकर यांचे अनोखे दर्शन झाले.संमेलनासाठी आलेल्या रसिकांनी कार्यक्रमापेक्षा पर्यटनाला अधिक महत्त्व दिल्याने रविवारी अखेरच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह रिकामे-रिकामेच होते. मोजक्या रसिकांची उपस्थिती होती. संमेलनासाठी तीनशे-चारशे नागरिक आले. मात्र अखेरच्या दिवशी यातील बहुतेकांनी संमेलनाकडे पाठ फिरविली. सकाळपासूनच पर्यटनाला सुरुवात झाली. महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारीही अभावानेच दिसून येत होते. रसिक नसल्याने वक्त्यांनी आपल्या भाषणातून नाराजी व्यक्त केली.संमेलनाच्या समारोप समारंभाला घुमान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे, खासदार, स्वागताध्यक्ष राहुल शेवाळे, अंदमानच्या कला आणि संस्कृती विभागाचे प्रमुख आर. देविदास, अंदमानचे खासदार विष्णूदास रे यांच्या पत्नी रूपा रे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, सुनील महाजन, पोर्ट ब्लेअर महाराष्ट्र मंडळाचे अरविंद पाटील उपस्थित होते.सावरकर यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांना सेल्यूलर जेलच्या भिंतीही थांबवू शकल्या नाहीत, असे मत आर. देविदास यांनी व्यक्त केले. अंदमान निकोबार बेटावर जपल्या जाणाऱ्या मराठी संस्कृतीचे त्यांनी कौतुक केले.(प्रतिनिधी)