‘मी शपथ घेतो की...’ आरटीओ देणार शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 07:54 PM2019-11-02T19:54:15+5:302019-11-02T20:01:50+5:30

शिकाऊ किंवा पक्क्या वाहन परवान्यासाठीच्या चाचणीपुर्वी आता प्रत्येकाला वाहतुक नियमांचे पालन करण्याची शपथ घ्यावी लागणार आहे...

RTO will be give Oath for everybody | ‘मी शपथ घेतो की...’ आरटीओ देणार शपथ

‘मी शपथ घेतो की...’ आरटीओ देणार शपथ

googlenewsNext
ठळक मुद्देप्रत्येक उमेदवाराला ही शपथ बंधनकारक राहणार पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्याचा शनिवार (दि. २) पासून अंमलबजावणी सुरू

पुणे : शिकाऊ किंवा पक्क्या वाहन परवान्यासाठीच्या चाचणीपुर्वी आता प्रत्येकाला वाहतुक नियमांचे पालन करण्याची शपथ घ्यावी लागणार आहे. याबाबत परिवहन विभागाने शुक्रवारी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना सुचना दिल्या आहेत. त्यानुसार त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे.
सुरक्षित रस्ते वाहतुकीसाठी परिवहन विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. केंद्र सरकारने नुकताच कायद्यात बदल करून दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. तसेच अपघात कमी करण्यासाठी विविध तरतुदीही करण्यात आल्या आहेत. सध्या वाहन चालन परवाना देण्यापुर्वी उमेदवारांना चाचणी द्यावी लागते. ही चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांना परवाना मिळतो. शिकाऊ व पक्का परवान्यासाठी वेगळी चाचणी असते. आता या चाचण्यांपुर्वी प्रत्येक उमेदवारांना वाहतुक नियमांची शपथ देण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले आहेत. त्यासाठी पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्टने शपथ तयार केली आहे. वाहन चालकांना जबाबदारीचे भान करून देणे व त्यातून वाहतुक नियमांविषयी चालकांमध्ये सजगता निर्माण करणे, हा त्यामागचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
ही शपथ मराठी व इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये असून उमेदवारांना त्यांच्या सोयीनुसार दोनपैकी कोणत्याही एका भाषेतून शपथ घेता येईल. शपथ घेतल्यानंतर त्याखाली उमेदवाराचे नाव, स्वाक्षरी व दिनांक नमुद करावे लागणार आहे. प्रत्येक उमेदवाराला ही शपथ बंधनकारक राहणार आहे. दरम्यान, परिवहन विभागाच्या आदेशानुसार, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्याचा शनिवार (दि. २) पासून अंमलबजावणी सुरू केली आहे. मुख्यालय, आयडीटीआर, आळंदी रस्ता आणि शिबीर कार्यालयाच्या ठिकाणी शिकाऊ व पक्क्या परवानाच्या चाचणीसाठी उपस्थित सर्व उमेदवारांना शपथ देण्यात आली. 
----------------------------
अशी असेल शपथ...
- मी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करेन तसेच माझ्या दुचाकीवरून प्रवास करणाºया दुसºया सहप्रवाशाला देखील हेल्मेट घालण्यास प्रवृत्त करेन.
- मी वाहन चालविताना माझे मन विचलित करणाºया मोबाईल वापरणे व त्यावरून मजकूर पाठविणे यासारख्या व्यत्ययाना टाळेन.
- मी रस्त्यावर कुठलाही हिसंक रोष/आवेशीत कृत्य व्यक्त करण्याचे टाळेन
- मी कधीही मद्यपान करून वाहन चालवणार नाही.
- मी कधीही लेन कापणार नाही किंवा रस्त्याच्या चुकीच्या बाजूने वाहन चालवणार नाही. 
-----------------

Web Title: RTO will be give Oath for everybody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.