पुणे शहरातील हजारो लहान घरमालकांना दिलासा; १ हजार चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत घरांना एकपट कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 13:32 IST2026-05-08T13:31:39+5:302026-05-08T13:32:37+5:30

महापालिका आयुक्तांच्या कार्यालयीन आदेशानुसार संबंधित निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत असून ९ फेब्रुवारी २०२६ पासून हा निर्णय लागू करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Relief for thousands of small homeowners in Pune city; One-time tax on unauthorized houses up to 1,000 square feet | पुणे शहरातील हजारो लहान घरमालकांना दिलासा; १ हजार चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत घरांना एकपट कर

पुणे शहरातील हजारो लहान घरमालकांना दिलासा; १ हजार चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत घरांना एकपट कर

पुणे : महापालिका हद्दीतील एक हजार चौरस फुटांपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या अनधिकृत निवासी मिळकतींना एकपट मिळकत कर आकारण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. लहान निवासी मिळकतींनाही सरसकट तीनपट कर आकारला जात असल्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाने हा निर्णय पुन्हा स्पष्ट केला आहे. त्यामुळे शहरातील हजारो लहान घरमालकांना दिलासा मिळणार आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. महापालिका आयुक्त कार्यालयाकडून यासंदर्भात अभिप्राय सादर करण्यात आला असून, ३० मे २०१९ च्या शासन निर्णयानुसार आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २६७ (अ) मधील तरतुदींनुसार ही कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. भाजपचे नगरसेवक विशाल धनवडे आणि नगरसेविका रूपाली धावडे यांनी स्थायी समितीत या विषयावर माहिती मागविली होती. त्यानुसार प्रशासनाने दिलेल्या अभिप्रायात एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत निवासी मिळकतींना एकपट कर आकारणी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांच्या ३० मे २०१९ तसेच ९ फेब्रुवारी २०२६ च्या कार्यालयीन आदेशानुसार संबंधित निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ९ फेब्रुवारी २०२६ पासून हा निर्णय लागू करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. शहरातील अनेक नागरिकांनी एक हजार चौरस फुटांखालील घरांनाही अनधिकृत बांधकामांच्या श्रेणीत टाकून तीनपट कर आकारला जात असल्याची तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्पष्टीकरण देत अशा निवासी मिळकतींना एकपट करच लागू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title : पुणे में राहत: 1000 वर्ग फुट तक के अनधिकृत घरों पर एक कर

Web Summary : पुणे के छोटे घर मालिकों को राहत मिली क्योंकि नगरपालिका ने 1000 वर्ग फुट तक की अनधिकृत आवासीय संपत्तियों पर एक कर लगाने का फैसला किया, जिससे अत्यधिक कराधान की शिकायतों का समाधान हुआ। यह निर्णय, 9 फरवरी, 2026 से प्रभावी, छोटे घरों के मालिकों पर वित्तीय बोझ को कम करना है।

Web Title : Pune Relief: Onefold Tax for Unauthorized Homes Upto 1000 Sq Ft

Web Summary : Pune's small homeowners get relief as the municipality decided to levy a onefold property tax on unauthorized residential properties up to 1000 sq ft, addressing complaints of excessive taxation. The decision, effective since February 9, 2026, aims to ease the financial burden on owners of smaller homes.