नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 16:15 IST2026-05-08T16:15:08+5:302026-05-08T16:15:43+5:30

विशेष म्हणजे, ही कार अवघ्या ३५ मिनिटांत ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. हा इलेक्ट्रिक कारच्या क्षेत्रातील एक महत्वाचा टप्पाही मानला जात आहे.

New 7-Seater Electric SUV Lexus TZ Launched 530 km range charge in just 35 minutes See the features | नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स

नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स

लेक्सस (Lexus) या जपानी ऑटोमेकर कंपनीने आपली पहिली ३-रो (three-row) इलेक्ट्रिक SUV 'Lexus TZ' जागतिक पातळीवर लॉन्च केली आहे. ही नवीन इलेक्ट्रिक SUV खास डिझाइन, जबरदस्त रेंज आणि हाय-टेक लक्झरी फीचर्ससह सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही कार अवघ्या ३५ मिनिटांत ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. हा इलेक्ट्रिक कारच्या क्षेत्रातील एक महत्वाचा टप्पाही मानला जात आहे.

प्रीमियम आणि मॉडर्न लूकसह खास अंदाज - 
या नव्या कारचा लूक काही प्रमाणावर Toyota Highlander प्रमाणे आहे. या कारची लांबी ५.१ मीटर असून तिचा व्हील बेस ३०५० मिमी एवढा आहे. यामुळे केबिनमध्ये अधिक जागा मिळते. या कारच्या पुढील बागात कंपनीची सिग्नेचर स्पिंडल ग्रिल देण्यात आली आहे. जी पूर्णपणे बंद (Closed) ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, C-आकाराचे LED हेडलाइट्स आणि २२ इंचाचे अ‍ॅल्युमिनियम अलॉय व्हील्स, हे या कारला अधिक प्रीमियम आणि मॉडर्न लूक देतात.

इंटीरियर लक्झरीअस -
कारचे इंटीरियर एखाद्या लक्झरी लाऊंजसारखे डिझाइन भासते. यात मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि २१-स्पीकर असलेली मार्क लेविन्सन साउंड सिस्टीम देण्यात आली आहे. याशिवाय, लांब पॅनोरामिक सनरूफ आणि दुसऱ्या रांगेतील प्रवाशांसाठी ऑटोमन सपोर्ट (Ottoman Support) यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. जी प्रवासाचा आनंद द्विगुणित करतात.

३५ मिनिटांत होईल १० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज -
परफॉर्मन्सचा विचार करता, ही SUV अत्यंत शक्तिशाली आहे. यात ७६.९६ kWh आणि ९५.८ kWh असे दोन बॅटरी पॅक पर्याय देण्यात आले आहेत. ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) सुविधेसह ही कार केवळ ५.४ सेकंदांत ० ते १०० किमी प्रतितास वेग धारण करू शकतो. 

कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, ही कार एकदा फुल चार्ज केल्यानंतर ५३० किलोमीटरपर्यंत धावू शकते. तसेच, ही कार १५० kW च्या फास्ट चार्जरच्या मदतीने अवघ्या ३५ मिनिटांत १० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

Lexus TZ इलेक्ट्रिक SUV, नवीन लेक्सस कार फीचर्स, ५३० किमी रेंज इलेक्ट्रिक कार, लेक्सस ईव्ही चार्जिंग वेळ, लक्झरी ७ सीटर इलेक्ट्रिक SUV, Lexus TZ Electric SUV Launch, Lexus TZ Range and Battery, Best Luxury 3-Row EV, Lexus TZ Fast Charging, Lexus TZ Price and Specifications

Web Title : लेक्सस ने TZ इलेक्ट्रिक SUV लॉन्च की: 530km रेंज, फ़ास्ट चार्जिंग!

Web Summary : लेक्सस ने TZ, एक 3-रो इलेक्ट्रिक SUV लॉन्च की, जिसकी रेंज 530km है। इसमें प्रीमियम डिज़ाइन, पैनोरमिक सनरूफ के साथ शानदार इंटीरियर और फ़ास्ट चार्जिंग क्षमताएं हैं, जो 35 मिनट में 80% तक चार्ज हो जाती है। यह 5.4 सेकंड में 0-100 किमी प्रति घंटे की रफ्तार पकड़ती है।

Web Title : Lexus Launches TZ Electric SUV: 530km Range, Fast Charging!

Web Summary : Lexus has launched the TZ, a 3-row electric SUV, boasting a 530km range. It features a premium design, luxurious interior with a panoramic sunroof, and fast charging capabilities, reaching 80% in 35 minutes. It accelerates 0-100kmph in 5.4 seconds.