शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू विक्रीवर छापा, नारायणगाव पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST

नारायणगाव : नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणगाव, साळवाडी, गुंजाळवाडी, धनगरवाडी गावात अवैध दारू विक्री करणाऱ्या ठिकाणावर छापा टाकून ...

नारायणगाव : नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणगाव, साळवाडी, गुंजाळवाडी, धनगरवाडी गावात अवैध दारू विक्री करणाऱ्या ठिकाणावर छापा टाकून ३ लाख ३ हजार ३९० रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांनी दिली.

धनगरवाडी गावच्या हद्दीमध्ये उसाचे शेताच्या कडेला नीलेश मारवाडी हा गावठी हातभट्टी दारू निर्मिती करीत असल्याची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक देशपांडे यांनी व तपास पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. तेथे पाच लिटर तयार गावठी हातभट्टी दारू व ३००० लिटर रसायन असे एकूण ३ लाख १ हजार रु. किमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी दारूभट्टी उद्ध्वस्त करून नीलेश मारवाडी तसेच नारायणगावच्या हद्दीमध्ये हाॅटेल विजयराजजवळ अवैध दारू विक्री केल्या प्रकरणी विजय मधुकर विटे यांचेवर महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम ६५(ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरी साळवाडी हद्दीमध्ये साळवाडी ते भोरवाडी जाणारे रोडचे कडेला सुरेश बसप्पा डोमाले हा दारू विक्री करत असताना मिळून आला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंजाळवाडी हद्दीमध्ये वारूळेमळा येथे अलका गोविंद वारूळे ही महिला देशी संत्रा कंपनीची दारू चोरून विक्री करत असताना मिळून आली. तिचेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देशपांडे, सहायक पोलीस निरीक्षक ताटे, पोलीस उपनिरीक्षक धनवे, पोलीस नाईक साबळे, शेख, पोलीस कॉन्स्टेबल कोबल, लोहोटे, तांबे, सातपुते, ढेंबरे, जायभाये यांनी केली आहे.

नारायणगाव पोलिसांनी धनगरवाडी येथे टाकलेल्या छाप्यात गावठी हातभट्टी रसायन नष्ट केले.